Headlines
Home » सामाजिक » प्राणप्रतिष्ठेनंतर प्रभू श्रीरामचे नमों नी घेतले पहिले दर्शन .

प्राणप्रतिष्ठेनंतर प्रभू श्रीरामचे नमों नी घेतले पहिले दर्शन .

अयोध्या दि.२२ ( प्रतिनिधि ) अयोध्येत रामलल्ला गर्भगृहात विराजमान झाले असून त्यांचा पहिली फोटो समोर आला आहे. भव्य दिव्य…बाल रूप, मोहक स्वरूप, असे अयोध्येतील श्रीरामलल्ला आहे. अनेक वर्षांची प्रतिक्षा संपत अयोध्येत धार्मिक विधीत प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. त्यात भगवान श्रीराम यांच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट आहे. गळ्यात मोत्याचा हार आहे. कानात झुमके आहेत. त्यांच्या हातात सोन्याचे धनुष्य आणि बाण आहे. रामलल्ला यांना पिवळ्या रंगाचे पितांबर नेसवले आहे.
अयोध्येतील प्रभू रामचंद्र यांच्या ५०० वर्षांचा वनवास आज संपला. दुपारी १२:२९ मिनिटांनी रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मूर्तीच्या डोळ्यावरची पट्टी काढली आणि पहिले दर्शन घेणारे भाविक बनल्याचा मान मिळवला. प्राणप्रतिष्ठेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरती केली .भगवान राम यांच्यासमोर ते नतमस्तक झाले. टीव्हीच्या माध्यमातून देशभरातील कोट्यवधी भाविकांनाही भगवान श्रीराम यांच्या मूर्तीचे दर्शन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूजा झाल्यानंतर संपूर्ण मंदिर परिसराची पाहणी केली.
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास देश विदेशातून आलेले प्रमुख अतिथी उपस्थित होते. त्यामध्ये माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, माजी उपराष्ट्रपती व्यंकया नायडू , संघचालक मोहन भागवत, उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी, गौतम अदाणी, बिग बी अमिताभ बच्चन, रजनीकांत आदी अनेक मान्यवर उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!