Headlines
Home » शैक्षणिक » १ मार्च २०२४ पासून जळगाव जिल्हातील कोण कोणत्या शाळेंच्या वेळेत होणार बदल ?

१ मार्च २०२४ पासून जळगाव जिल्हातील कोण कोणत्या शाळेंच्या वेळेत होणार बदल ?

जळगाव | दि २९ ( वास्तव पोस्ट न्यूज )– मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांचेकडून शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद जळगांव, शिक्षणाधिकारी पंचायत समिती जळगाव , प्रशासन अधिकारी मनपा/नपा शिक्षण मंडळ जळगाव यांना सर्व माध्यमाच्या प्राथमिक शाळेच्या उन्हाळ्यातील शालेय वेळेत बदल करणेबाबत एक पत्रक देण्यात आले आहे .

सध्या उन्हाळ्याची चाहुल लागली असून उन्हाची तिव्रता वाढत असल्याने जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत सर्व माध्यमांच्या प्राथमिक शाळेंच्या वेळेत दिनांक ०१ मार्च २०२४ पासुन एका सत्रात भरणाऱ्या शाळेंच्या वेळेत सकाळी ०७.०० ते १२.३० असा बदल करण्यात आला आहे. बाजाराच्या दिवशी शाळेची वेळ ही सकाळी ०७.०० ते १०.३० वा. पर्यंत राहील. शाळेची मधली सुट्टीची वेळ ३० मिनिटांची असेल, तर दोन सत्र पध्दतीने भरणाऱ्या शाळेच्या वेळेत कोणताही बदल नाही.

दरम्यान बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार नियोजित अध्यापनाच्या तासात कोणताही बदल होणार नाही याची दक्षता घ्यावयास सांगण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!