Headlines
Home » जळगाव » वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे ‘कृतज्ञता तालांजली’ कार्यक्रमाचे आयोजन

वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे ‘कृतज्ञता तालांजली’ कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : दि. ५ सप्टेंबर २०२५ शिक्षकदिनी अर्थातच गुरूदिनी तालमणी पं. जयंत नाईक यांना देवाज्ञा झाली. जळगाव आकाशवाणी, चांदोरकर प्रतिष्ठान, बालगंधर्व संगीत महोत्सवा सह जळगाव, नाशिकच्या सांस्कृतिक परिघाशी त्यांचं अतुट नातं होतं. त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले. असा हा प्रतिभासंपन्न कलावंत काळाच्या पडद्याआड गेला तो कायमचाच. अश्या या तालमणी प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा शिष्य परिवार एकत्रित सहवादन करणार आहेत. पं. जयंत नाईक यांच्या कलेवर प्रेम करणाऱ्या सर्व जळगावकर रसिक व संगीत प्रेमींनी या ‘कृतज्ञता तालांजलीस’ उपस्थित रहावे असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम हा शनिवार दि. ११ ऑक्टोबर २०२५ रोजी संध्याकाळी ठीक ७ वाजता भाऊंचे उद्यान जळगाव येथे संपन्न होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!