Headlines
Home » क्रीडा » तायक्वांडो : जैन स्पोर्टस् अकॅडमीचा पुष्पक महाजन यास सुवर्ण तर यश, पुर्वा आणि गौरी यांना कांस्यपदक

तायक्वांडो : जैन स्पोर्टस् अकॅडमीचा पुष्पक महाजन यास सुवर्ण तर यश, पुर्वा आणि गौरी यांना कांस्यपदक

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : दि. २८ ते ३० सप्टेंबर या कालावधीत लातुर येथे ३४ व्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ महिला व पुरुष तायक्वांडो स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. २८ जिल्ह्यांतील ४०० खेळाडूंनी या स्पर्धेत यशस्वी सहभाग नोंदविला. यात पुणे जिल्ह्याने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले तर छत्रपती संभाजीनगर उपविजेते ठरले.

या स्पर्धेत जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे तथा जैन स्पोर्टस् अकॅडमी चा संघ सहभागी झाला होता. यामध्ये पुरुषांच्या ७४ किलो आतील वजन गटात पुष्पक रमेश महाजन याने सलग चौथ्यांदा सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. तर ५८ किलो गटात यश शिंदे याने कांस्यपदक पटकावले.

महिलांच्या ५२ किलो आतील वजन गटात पुर्वा चौधरी आणि गौरी कुमावत यांनी कांस्यपदक पटकावले त्यांना मुख्य प्रशिक्षक जयेश बाविस्कर यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. यांच्या या यशाबद्दल संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष ललीत पाटील, महासचिव अजित घारगे, कोषाध्यक्ष सुरेश खैरनार, सहसचिव रविंद्र धर्माधिकारी, सदस्य महेश घारगे, नरेंद्र महाजन, कृष्णकुमार तायडे, सौरभ चौबे तसेच अरविंद देशपांडे, हरिभाऊ राऊत, जिवन महाजन, सुनील मोरे, निकेतन खोडके, श्रीकृष्ण चौधरी, विजय चौधरी, शुभम शेटे आदिंनी कौतुक केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!