Headlines
Home » जळगाव » जेष्ठांनी साजरा केला ‘जेष्ठ नागरिक अवहेलना दिन’

जेष्ठांनी साजरा केला ‘जेष्ठ नागरिक अवहेलना दिन’

जेष्ठ नागरिक अवहेलना दिनी सभेत जेष्ठांना मार्गदर्शन करतांना माजी शिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेटकर

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : चैतन्य नगर जेष्ठ नागरिक संघात आज सकाळी १०:३० वाजता “जागतिक जेष्ठ नागरिक अवहेलना दिना” निमित्त सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी दत्तात्रय चौधरी माजी अध्यक्ष फेस्कॉम मुंबई हे होते. याप्रसंगी प्रमुख वक्ते सिद्धार्थ नेटकर माजी शिक्षणाधिकारी यांनी जेष्ठांच्या व्यथा मांडून, त्यांचे होणारे छळ, केली जाणारी अवहेलना यासंबंधी माहिती दिली. तसेच जेष्ठ नागरिकांचे मानसिक, सामाजिक, शारीरिक छळ निवारण संबंधी विस्तृत मार्गदर्शन केले.

यावेळी उपस्थित सदस्यांनी त्यांना होणाऱ्या समस्या सांगितल्या, डी. टि. चौधरी यांनी जेष्ठ नागरिक संघात समस्या निवारण कक्ष स्थापन करून जेष्ठ नागरिकांना त्यांच्या समस्येविषयी मदत करावी असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. अरुण धांडे यांनी प्रास्ताविक आणि प्रमुख अतिथींचा परिचय व स्वागत केले. प्रा. मोते सर यांनी सूत्रसंचालन केले तथा जेष्ठांच्या अवहेलना निवारणासंबंधी माहिती दिली. माजी अध्यक्ष पंडितराव सोनार यांनी आभार प्रदर्शन केले.

सभेची सांगता पसायदानाने झाली. यावेळी डॉ. के.के. भोळे माजी अध्यक्ष, व्हि. डी. सोनवणे, उमेश पाटील, दिनेश पाटील, विकास बोरोले, उपाध्यक्ष साहेबराव पाटील, अंजली चौधरी, अविनाश राव, सौ प्रमिला आदी सभासद उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!