एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) तर्फे राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील क्रिकेट स्कोअरर्ससाठी राज्य पॅनलमध्ये सहभागी होण्याची अनोखी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मे २०२५ मध्ये होणाऱ्या स्कोअरर्सच्या परीक्षेद्वारे पात्र उमेदवारांची निवड करून त्यांना राज्यस्तरीय पॅनलमध्ये स्थान मिळणार आहे.  महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून या परीक्षेसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून,…

Read More

महिला बचत गटासाठी दोन कोटींचं व्यापारी संकुल उभारणार : मंत्री गुलाबराव पाटील

नशिराबाद ( वास्तव पोस्ट ) : “महिला बचत गट” हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ असून नशिराबाद मधील महिला बचत गटांना आर्थिक हातभार लावण्यासाठी २ कोटी रुपयांचे व्यापारी संकुल उभारण्यास मंजुरी देण्यात आली असून स्वतःच्या पायावर उभं राहावं, यासाठी या संकुलाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. “रस्ते  म्हणजे केवळ वाहतुकीचा मार्ग नाही, तर विकासाची रक्तवाहिनी असते. या…

Read More

के सी ई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के सी ई सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी करण्यात आली.या प्रसंगी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुगंधी, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डीन प्रा.गणेश पाटील, आयक्यूएसी समन्वयक प्रा. कल्पेश महाजन या प्रमुख मान्यवरांच्या…

Read More

जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह गारपिटमुळे पिकांचे मोठे नुकसान ; पालकमंत्र्यांनी दिले पंचनाम्याचे निर्देश

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : रावेर तालुक्यात व १३ एप्रिल रोजी जळगाव तालुक्यात आलेल्या वादळी वाऱ्यांसह पावसामुळे व गारपिटीनंतर शेतपिकांचे नुकसान झाले आहे. विशेषतः रावेर शहरासह भोकर, भादली खुर्द परिसरामध्ये तसेच जिल्ह्यात इतर ठिकाणीही केळी व मका या नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. अचानक आलेल्या या हवामान बदलामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले…

Read More

जिल्ह्यातील उद्योगांसाठी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद संपन्न ; जिल्ह्यात १६३६ कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार !

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : उद्योग सुलभतेसाठी २१ कोटी रुपयांच्या निधीतून आधुनिक ‘उद्योग भवन’ उभारले जात असून, कुसुंबा व चिंचोली येथे २८५ हेक्टर जागेचे भूसंपादन करून नवीन MIDC विकसित करण्याची प्रक्रिया सुरू असून  जागा उपलब्धते बाबत  जिल्हाधिकारी स्तरावर कार्यवाही सुरु आहे. जिल्ह्यात प्लास्टिक उद्योगांची वाढती संख्या लक्षात घेऊन ‘प्लास्टिक औद्योगिक समूहा’ साठी उद्योजकांनी यासाठी सहकार्य…

Read More

दशमा भवानीच्या नृत्यात रंगले पालकमंत्री ; भक्तिमय वातावरणात पाळधीच्या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

पाळधी ( वास्तव पोस्ट ) : दशमा भवानी नृत्य ही आपल्या खान्देशातील संस्कृतीची शान आहे. या पवित्र मातेच्या चरणांशी जोडलेला हा अनुभव आयुष्यभर लक्षात राहील. यात्रेच्या निमित्ताने एकत्र येणं, हेच श्रद्धेचं प्रतिक आहे. भवानी मातेच्या आशीर्वादाने आपण समाजहिताची कामं करत राहणं, हीच खरी पूजा आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गुलाबराव पाटील यांनी…

Read More

समतेच्या सूर्याचा उदय म्हणजे महात्मा फुले : पालकमंत्री गुलाबराव पाटील

शिरसोली ( वास्तव पोस्ट ) : “महात्मा फुले हे केवळ समाजसुधारक नव्हते, ते एक विचारमंत्र होते,” असे सांगताना पालकमंत्री पाटील म्हणाले, “त्यांनी ‘सत्यशोधक समाज’ स्थापन करून समाजातल्या वंचित, शोषित घटकांना आवाज दिला. शिक्षण हा प्रत्येकाचा अधिकार आहे, हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केलं.” “समाजाचं खरं उध्दार हे शिक्षणातूनच शक्य आहे, याचा मंत्र महात्मा फुलेंनी दिला…

Read More

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात तालुकास्तरावर अनुभूती इंग्लीश मिडीअम स्कूल प्रथम

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शासनाच्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियाना अंतर्गत खासगी संस्था गटामध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेत तालुकास्तरावर अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल ला प्रथम पारितोषिकाने गौरविण्यात आले. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यातील पारतोषिक वितरण समारंभ जिल्हा नियोजन भवन येथे पार पडला. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते…

Read More

जळगाव व चोपड्याला नवे बसतळ मंजुरीसाठी प्रयत्नशील ; लालपरीच्या नव्या पर्वाची सुरुवात.

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : “लालपरी म्हणजे फक्त प्रवास नाही, ती लाखो कुटुंबांच्या जीवनाशी जोडलेली आशेची दोरी आहे. आईच्या पदरा इतकाच विश्वास देणारी ही सेवा आता नव्या रूपात जनतेसमोर येतेय,” जळगाव व चोपडा येथे आधुनिक बसतळ मंजुरीसाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते आज जळगाव येथे पाच नव्या एस.टी. बसच्या लोकार्पण…

Read More

मेट्रो, ई-बसनंतर शहरी वाहतुकीसाठी ई-ट्रांझिटवर शासनाचा विचार !

पुणे ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृह येथे पिंपरी चिंचवड शहरात प्रायोगिक तत्त्वावर ई-ट्रांझिट सुरू करण्यासंदर्भात HESS-AG कंपनीच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली. शहरी वाहतुकीसाठी ई-ट्रांझिट हा एक प्रभावी पर्याय ठरू शकतो त्यामुळे या प्रकल्पाच्या आर्थिक व तांत्रिक व्यवहार्यतेचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री…

Read More

धार्मिक-सामाजिक एकतेचा उत्सव बोरगावात साजरा ; पालकमंत्र्यांच्या हस्ते सामाजिक सभागृहाचे लोकार्पण

तीन दिवसांच्या भागवत सप्ताहाने गावात भक्तिरसाची उधळण : धरणगाव ( वास्तव पोस्ट ): बोरगाव बु. येथील मध्यवर्ती श्री मारोती मंदिर परिसरात २० लाखांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या भव्य सामाजिक सभागृहाचे लोकार्पण व श्री मारोती रायांची प्राणप्रतिष्ठा पालकमंत्री व पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते व विधिवत पूजाविधीने संपन्न झाली. या शुभप्रसंगी बोलताना पालकमंत्री गुलाबराव…

Read More

एस. एस. मणियार विधी महाविद्यालयात अंतिम वर्ष विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : एस. एस. मणियार विधी महाविद्यालयात बीएएलएलबी आणि एलएलबी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ घेण्यात आला. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे सचिव ॲड. प्रमोद पाटील, सहसचिव ॲड. प्रवीणचंद्र जंगले हे लाभले होते. यावेळी मंचावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार रेड्डी, डॉ. विजेता सिंग होते. यावेळी नुकतेच…

Read More

के सी ई सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात पालक सभा उत्साहात संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : केसीई सोसायटीचे  कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ वर्ष  अभियांत्रिकी, इलेक्ट्रिकल व मेकनिकल विभागाच्या विद्यार्थ्यांकरिता शिक्षक-पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. सदर सभेस विद्यार्थी आणि पालकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदविला. यावेळी चालू शैक्षणिक सत्रात झालेल्या अभ्यासक्रमावर घेण्यात आलेल्या घटक चाचणीत विद्यार्थ्यांनी लिहिलेले पेपर व त्यांनी संपादन…

Read More

नवकार महामंत्राचा जप : जळगावातून ८१ हजार जणांची विश्वशांतीसाठी प्रार्थना

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ‘एक मन, एक व्यक्ती, एक चेतनेतून नवकार मंत्राची अनुभूती ही अध्यात्मिक शक्तीची प्रचिती आहे. विश्व नवकार दिना निमित्त पाणी बचत, वृक्षारोपण, स्वच्छता, स्वदेशी वस्तूंचा वापर, भारत दर्शन, सेंद्रीय शेती, हेल्दी लाईफ स्टाईल, योग व खेल कूद आणि गरिबांसाठी सहाय्य या नऊ संकल्पातून मानवतेसह सृष्टीचे संवर्धन करूया.!’ असा मोलाचा संदेश…

Read More

जळगाव सामाजिक न्याय विभाग कार्याचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतला आढावा

महानगरासाठी वसतीगृहांची संख्या वाढविण्याचे निर्देश जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागामार्फत उत्तम सोयी-सुविधांनी युक्त वसतीगृहे उभारण्यात आलेली आहेत. मात्र, जळगावसारख्या मोठ्या शहरात वसतीगृहांसाठी प्रवेश मागणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने, नव्या वसतीगृहांची आवश्यकता निर्माण झाली आहे. यासाठी नवीन प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज दिले. नियोजन भवन,…

Read More
error: Content is protected !!