Headlines
Home » जळगाव » डाॅ.नयना झोपे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

डाॅ.नयना झोपे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ज्ञानभारती फाउंडेशन संस्थेतर्फे डाॅ. उल्हास पाटील विधीविद्यालयाच्या प्राचार्या डाॅ. नयना झोपे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. नयना आणि त्यांचे पती या दोघांचेही सामाजिक कार्य अतिशय उल्लेखनिय असून त्या एक चांगल्या समाजसेविका आहेत.

डाॅ. नयना नितीन महाजन झोपे या पी.एच.डी. झालेल्या असून त्यांचे कायदेविषयक चार पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्यांचे पुस्तकं ऑनलाईन देखील उपलब्ध आहेत. डॉ. झोपे या निसर्ग प्रेमी असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त बेलाचे वृक्ष लावण्यात आले. यावेळी ज्ञानभारती फाउंडेशनच्या अध्यक्षा भारती कुमावत, काउंसेलर तसेच ज्ञानभारती फाउडेशनचे सचिव रितीक कुमावत आदी उपस्थीत होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!