जळगाव जिल्ह्यात १००४ शिक्षकांच्या ‘बोगस शालार्थ आयडी’चा महास्फोट: आकडा तिपटीने वाढण्याची भीती
जळगाव l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क राज्यातील शिक्षण विभागात खळबळ उडाली असून, जळगाव जिल्ह्यातील बोगस शालार्थ आयडी प्रकरणाने आता रौद्र रूप धारण केले आहे. विशेष तपास पथकाने (SIT) तयार केलेल्या ताज्या अहवालानुसार, जिल्ह्यातील तब्बल १००४ शिक्षकांची नावे संशयास्पद आढळली असून, ही यादी नाशिकच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सुपूर्द करण्यात आली आहे. प्राथमिक अंदाजानुसार, पुढील तपासात हा…
