Headlines

मुख्यमंत्र्यांनी दिले ग्रामरोजगार सेवकांचे गटविमा काढण्याचे निर्देश

राज्यातील ग्रामरोजगार सेवकांच्या विविध मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली मुंबई दि. २ ( प्रतिनिधी )– ग्रामपंचायतस्तरावर काम करणाऱ्या ग्राम रोजगार सेवकांच्या विविध मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक असून ग्रामरोजगार सेवकांचा गटविमा काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले. ग्रामरोजगार सेवकांच्या पदनामात बदल करुन ते ग्रामरोजगार सहायक करण्यात येईल, असे जाहीर करतानाच मानधनात…

Read More

सर्वसामान्यांना न्याय देणारा, आत्मनिर्भर व बलशाली भारताचा पाया घालणारा अर्थसंकल्प ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदें

मुंबई दि. २ (प्रतिनिधी )– आत्मनिर्भर व बलशाली भारताचा पाया घालणारा आणि विकसनशील भारत ते विकसित भारत अशी वाटचाल करणारा अर्थसंकल्प आहे. हा केंद्रीय अर्थसंकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मागील १० वर्षांच्या प्रयत्नांचे फलित असून देशाला महासत्ता बनवण्याच्या आणि देशाला ५ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याच्या त्यांच्या लक्ष्याकडे घेऊन जाणारा अर्थसंकल्प आहे. सर्वसमावेशक, सर्वसामान्यांना न्याय देणारा,…

Read More

समता परिषद व ओबीसी बांधवांतर्फे कुणबी प्रमाणपत्राबाबत तहसिलदारांना निवेदन सादर

कजगाव दि.२ ( प्रतिनिधी )–महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला मराठा आरक्षणाअंतर्गत सगेसोयरे या धरतीवर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचे अध्यादेशानुसार आश्वासित केले आहे. यामुळे ओबीसीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आपला हा निर्णय मूळ ओबीसींवर अन्याय करणारा आहे ,अशा व विविध हरकतीचें निवेदन गुरुवारी आमदार किशोर पाटील व भडगाव तहसीलदार मुकेश हिवाळे यांना भडगाव तालुका समता…

Read More

साहित्य संमेलना ठिकाणी साने गुरुजींच्या हस्ताक्षरातील छात्रालय दैनिकाचे आकर्षण

अमळनेर दि.१ ( प्रतिनिधी ) पूज्य साने गुरुजींनी १०० वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेले हस्ताक्षरातील ‘छात्रालय दैनिक’ साहित्य संमेलनाच्या ठिकाणी आकर्षण ठरले आहे. विशेष म्हणजे साने गुरुजींनी स्वतःच्या हस्ताक्षरात त्यावेळी लिहिलेले दैनिक आजही पाहायला मिळत आहे.जुलै १९२३ मध्ये पूज्य साने गुरुजी तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी अमळनेरमध्ये आले. महाविद्यालयात शिकत असताना त्यांच्यातील कलागुण आणि कौशल्य पाहून श्रीमंत प्रताप…

Read More

१०० हात करताहेत साहित्य नगरीची स्वच्छता

अमळनेर दि.१ ( प्रतिनिधी ) – उद्या २ फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या साने गुरुजी साहित्य नगरीत संमेलन परिसराच्या स्वच्छतेचे काम गेल्या १५ दिवसांपासून सुरू असल्याची माहिती अमळनेर नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाचे सुपरवायझर हैबतराव पाटील यांनी दिली.साहित्य संमेलन प्रताप महाविद्यालयात होत आहे. त्यानुसार मुख्य सभामंडपासह पूर्ण परिसर झाडणे, कचरा उचलून तो ६ घंटागाड्यात टाकून तो निर्धारीत कचरा…

Read More

अमळनेरात आजपासून सारस्वतांची मांदियाळी

अ.भा. मराठी साहित्य संमेलनासाठी साहित्यिकांसह रसिक दाखल अमळनेर दि. १ ( प्रतिनिधी ) – अखिल भारतीय मराठी महामंडळाचे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २ फेब्रुवारीपासून साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेरात सुरू होत आहे. या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने राज्यभरातील अनेक साहित्यिकांसह रसिक अमळनेरात दाखल झाले आहेत. साहित्य संमेलनामुळे सर्वत्र प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. १९५२…

Read More

बालसाहित्यातून उद्याचे युवक घडतात : शुभम देशमुख

बालसाहित्याला विद्यार्थ्यांचा मिळाला अलोट प्रतिसाद अमळनेर दि. १( प्रतिनिधी ) – बाल साहित्यातील कथा, कविता, कादंबऱ्या, एकांकिका, नाटिका या सर्वांमधून आपण नेहमी सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न करत असतो. उद्याच्या समाजाचा आधारस्तंभ असणाऱ्या युवकांची सदृढ मानसिकता तयार करण्याचा प्रयत्न बालसाहित्यातून केला जातो, असे प्रतिपादन बालसाहित्यिक शुभम देशमुख याने आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. कलाआनंद बाल मेळाव्याचे आज…

Read More

अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी दिली जळगावी बहिणाबाईंच्या वाड्यास भेट

अमळनेर दि. १ ( प्रतिनिधी ) ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि नामवंत साहित्यिक प्रा. डॉ. रवींद्र शोभणे यांनी बुधवारी सायंकाळी जळगाव येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या ऐतिहासिक वाड्यास भेट दिली. त्यांनी बहिणाबाईंच्या कुटुंबियांशी संवाद साधला. प्रा. डॉ. रवींद्र शोभणे यांचे नागपूर येथून काल सायंकाळी जळगाव येथे आगमन झाले. यानंतर त्यांनी जुन्या…

Read More

आदिवासी क्षेत्रातील कुपोषण कमी करण्यासाठी गठीत कार्य दलाची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे संपन्न

मुंबई दि. १ ( प्रतिनिधी ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज आदिवासी क्षेत्रातील कुपोषण कमी करण्यासाठी गठीत कार्य दलाची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. कार्यदलाचे अध्यक्ष डॉ. दीपक सावंत यांनी कार्य दलाचा पहिला अहवाल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना सुपुर्द केला. यावेळी गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य…

Read More

शहर स्वच्छतेकडे जास्तीत जास्त लक्ष द्या – ज‍िल्हाध‍िकाऱ्यांच्या नगरपर‍िषद मुख्याध‍िकाऱ्यांना सूचना

नगरपर‍िषद व नगरपंचायतीच्या प्रशासकीय कामकाजाचा आढावा जळगांव, द‍ि.१ ( प्रतिनिधी ) माझी वसुंधरा व स्वच्छता अभ‍ियानात नगरपाल‍िकांनी ह‍िरारीने सहभाग घेऊन अंतर्गत रस्ते, प्रभाग स्वच्छतेवर जास्तीत जास्त भर दयावा, तसेच शहरात फिरुन स्वच्छतेबाबत विविध उपाययोजना राबविण्यात याव्यात व शहरे स्वच्छ होतील याकडे जास्तीत-जास्त लक्ष दयावे. अशा सूचना ज‍िल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज येथे द‍िल्या. ज‍िल्ह्यातील सर्व…

Read More

मतदान टक्केवारी वाढव‍िण्यासाठी मोहीम राबवा, व‍िद्यार्थ्यांना सहभागी करून घ्या – मुख्य न‍िवडणूक अध‍िकारी श्रीकांत देशपांडे

ज‍िल्ह्यातील न‍िवडणूक तयारीचा आढावा जळगाव दि.३१ ( प्रतिनिधी ) मतदानाच्या दिवशी मतदार केंद्रापर्यंत मतदार आले पाहिजेत. मतदानाचे प्रमाण वाढले पाहिजे. यासाठी मतदारांमध्ये जावून त्यांच्याशी संवाद साधावा, त्यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. स्थानिक पातळीवरील विविध संघटना, समूह व विद्यार्थ्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करून मोहीमेत सहभागी करून घ्यावे. अशा सूचना राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आज…

Read More

अ.भा. मराठी साहित्य संमेलनात संमेलनपूर्व सांस्कृतिक कार्यक्रमांना रसिकांची लक्षणीय हजेरी

अमळनेर l जि.जळगाव ( प्रतिनिधी ) : ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास अमळनेर येथे २ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर संमेलनपूर्व सांस्कृतिक कार्यक्रम २९ जानेवारीपासून आयोजित करण्यात आले होते. याचा ३१ रोजी समारोप करण्यात आला. पूर्व सांस्कृतिक कार्यक्रमांस आर्या शेंदुर्णीकर (जळगाव) यांनी कथ्थक नृत्याने बहारदार सुरुवात केली. साहित्य संमेलनात संमेलनपूर्व सांस्कृतिक कार्यक्रमांना…

Read More

अर्थसंकल्प २०२४; सरकारकडून आश्चर्याची अपेक्षा

मुंबई दि.३१ ( प्रतिनिधी )- अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अंतरिम अर्थसंकल्प (अंतरिम बजेट 2024) सादर करणार आहेत. कारण काही महिन्यांनी देशात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या मिनी बजेटकडून जनतेच्या मोठ्या अपेक्षा आहेत. यावेळी अर्थसंकल्पात सरकार महिला व्यावसायिकांसाठीही काही ऑफर जाहीर करु शकते. असं असलं तरी, सरकार ज्या प्रकारे देशातील बोर्ड आणि…

Read More

मार्च २०२४ च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र शाळांसाठी ऑनलाईन उपलब्ध

पुणे दि. ३१ ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचेशी संलग्न असलेल्या सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांना माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा मार्च २०२४ साठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र (Hall Ticket) उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे सूचित करण्यात आले आहे. सर्व…

Read More

मोठी बातमी : जिल्हा पोलीस अधिक्षकांची बदली; रेड्डी नवे एसपी .

जळगाव दि. ३१ ( प्रतिनिधी )जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांची बदली झाली असून त्यांच्या जागी एमसीव्ही महेश्‍वर रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर काही वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात जळगावचे पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांची बदली करण्यात आली आहे. लक्षणीय बाब म्हणजे अवघ्या काही महिन्यांमध्ये त्यांची बदली करण्यात…

Read More
error: Content is protected !!