कोविड योद्ध्यांना कंत्राटी सेवेत सामावून घ्या ; जनसेवा विचारधारा फाऊंडेशनतर्फे महापौर दीपमाला काळे यांना निवेदन
वास्तव पोस्ट l जळगाव : आज बुधवार दि.२४ रोजी महापौर दीपमाला काळे व उपमहापौर मनोज चौधरी महानगरपालिका जळगाव यांना जनसेवा विचारधारा फाऊंडेशन जळगाव यांच्यावतीने कोविड १९-काळात कंत्राटी सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विविध विभागात कंत्राटी कर्मचारी म्हणून समावेश करावा अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. कोविड-१९ महामारी कालखंडात कोविड बाधितांची सुश्रुषा करण्यासाठी रक्ताचे नातेवाईक देखील…
