Headlines
Home » सांस्कृतिक » जळगाव पोलीस कवायत मैदानावर जिल्हा प्रशासनाद्वारे महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन

जळगाव पोलीस कवायत मैदानावर जिल्हा प्रशासनाद्वारे महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन

जळगाव | दि.२७ ( वास्तव पोस्ट न्यूज )– जळगाव जिल्हा प्रशासनाद्वारे महा संस्कृती महोत्सवाचे दि.२८ फेब्रुवारी ते दि.०३ मार्च, २०२४ कालावधीत पोलीस कवायत मैदान जळगाव येथे सायं ०५:३० ते ०९:३० या वेळेत सर्व जळगाव जिल्हावासियांना महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे .

या महासंस्कृती महोत्सवात पाचही दिवशी वेगवेगळे रंगारंग कार्यक्रम असतील. त्यात बुरगुंडा, भारुड, पारंपरिक गीते, जिजाऊँच्या लेकी पोवाडा, शिवकालीन लोककला, करपावली, दृकश्राव्य तसेच महाराष्ट्राची हास्यजत्रा, पारंपारिक लोकनृत्य, शिवकालीन मर्दानी खेळ, नाटक, गणगवळन, पोवाडा, गोंधळ, बहिणाबाईंच्या काविता वाचन, चित्रकला, वेशभूषा, वकृत्व स्पर्धा इ. अशा अनेक प्रकारच्या कार्यक्रमाची पर्वणी असणार आहे. तरी जिल्हावासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आंनद घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाकड़ून करण्यात आले आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!