मुंबई | दि.२७ ( वास्तव पोस्ट न्यूज )– महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात दररोज काहीना काही घडामोडी घडत असुन राजकीय चर्चेंना उधाण आले आहे. आज अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राज्यसभा सचिवालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणारे राज्यसभेचे निवडून आलेले सदस्य प्रफुल्ल पटेल यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
आज २७ रोजी राज्यसभेच्या अध्यक्षांनी प्रफुल्ल पटेल यांचा राजीनामा स्वीकारला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ते राज्यसभेचे सदस्य होते. मे २०२७ पर्यंत त्यांचा कार्यकाळ होता .
अजित पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झाली त्यावेळी प्रफुल्ल पटेल म्हणाले होते की, मला राज्यसभेची उमेदवारी घोषित केल्याबद्दल मी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सर्व सहकाऱ्यांचे आभार मानतो. माझ्या राजीनाम्यामुळे रिक्त होणाऱ्या जागी अन्य कुणाला संधी मिळेल. त्यामुळे फार अफवा पसरवण्याची गरज नाही. ज्या गोष्टी तुम्हाला रहस्य वाटतायेत त्या आम्हाला वाटत नाही. अनेक गोष्टी भविष्यात समोर येतील. त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेतले होते.

