Headlines
Home » जळगाव » के.सी.ई. इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयाचे अविष्कार २०२४ संशोधन स्पर्धेत विद्यापीठ स्तरावर यश

के.सी.ई. इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयाचे अविष्कार २०२४ संशोधन स्पर्धेत विद्यापीठ स्तरावर यश

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव द्वारे घेण्यात आलेल्या अविष्कार २०२४ या स्पर्धेचे विद्यापीठ स्तरावर आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जवळपास ३६३ विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या श्रेणीत पोस्टर द्वारे संशोधन सादर केले. यापैकी एकूण ४८ संघांची निवड करण्यात आली.

द्वितीय फेरी मध्ये के.सी.ई. इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयाचे तीन संघ निवडले गेले होते. यापैकी दोन संघांची निवड राज्यस्तरीय पातळीवर करण्यात आले. वैष्णवी सूर्यवंशी, श्वेता तायडे, प्रज्ञा चौधरी, गायत्री चौधरी या सर्व विद्यार्थ्यांचं सादरीकरण उत्कृष्ट झाले. के.सी.ई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय सुगंधी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
. अविष्कार २०२४ चे समनव्यक प्रा.कोमल जैन यांनी मार्गदर्शन करून यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील फेरीसाठी शुभेच्छा दिल्या. या विद्यार्थ्यांनी डिजिटल मार्केटिंग, आर्टीफिशियल इंटेलिजन्स, डेव्हलोपमेंट ऑफ अनऑर्गनाईज्ड सेक्टर अशा विविध विषयावर अविष्कार २०२४ स्पर्धेत सादरीकरण केले .

या कार्यक्रमाकरिता प्रा हर्षा देशमुख, प्रा.डिगंबर सोनवणे, डॉ.वीणा भोसले, प्रा.शेफाली अग्रवाल, प्रा.तनया भाटिया, प्रा.गोडबोले, प्रा.हेमंत धनधरे, प्रा.देवेंद्र पाटील व प्रा.रेवती पाटील, अशोक काळे यांचे सहकार्य लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!