Headlines
Home » जळगाव » जळगाव येथे कर्पुरी ठाकुर यांची जयंती साजरी

जळगाव येथे कर्पुरी ठाकुर यांची जयंती साजरी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : आज जळगावात बिहारचे मा.मुख्यमंत्री व ओबीसींचे आधारवड स्मृतीशेष भारतरत्न कर्पुरी ठाकुर साहेब यांची जयंती जळगाव शहरातील सैनी (नाभिक) बांधवांनी आयोजित केली होती.

या प्रसंगी सुमित्र अहिरे (राज्य मुख्य कार्याध्यक्ष बामसेफ), देवानंद निकम (जळगाव जिल्हा अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा), खुशाल सोनवणे (शहर सचिव,बीएमपी) यांनी जयंती समारंभात उपस्थिती नोंदविली.

या प्रसंगी नाभिक समाजाचे नेते देविदास फुलपगारे, बंटी नेरपगारे, मनोहर खोंडे, राजकुमार गवळी यांनी कर्पुरी ठाकुर यांच्या कार्य स्मृतींना उजाळा दिला. सुमित्र अहिरे यांनाही विचार व्यक्त करण्याची संधी आयोजकांनी दिली. आपले मत व्यक्त करताना कर्पुरी ठाकुर व सध्या ‘ओबीसी समाजाची दिशा व दशा’ या विषयावर मत व्यक्त करून मोलाचे मार्गदर्शन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!