Headlines
Home » जळगाव » के.सी.ई च्या पी.जी. महाविद्यालयात विद्यार्थ्यांना बौद्धिक संपदा व उद्योजकता विकासाचे धडे

के.सी.ई च्या पी.जी. महाविद्यालयात विद्यार्थ्यांना बौद्धिक संपदा व उद्योजकता विकासाचे धडे

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : पी. जी. महाविद्यालयात विज्ञानातील जागतिक नेतृत्वासाठी भारतीय तरुणांच्या उद्योजकता आणि बौद्धिक संपदा अधिकार विकास या विषयावर एक दिवसीय चर्चासत्राचे पार पडले. चर्चासत्राचे आयोजन महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी सेल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.बी. महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या बौद्धिक संपदा अधिकार कक्षाचे समन्वयक डॉ. विकास गीते, डॉ.व्ही.एस. झोपे, आय. क्यू. ए. सी. समन्वयक प्राध्यापक संदीप पाटील उपस्थित होते. चर्चासत्रात महाविद्यालयातील विविध विभागातील विद्यार्थी व शिक्षकांनी सक्रिय सहभाग नोंदवला. पदव्युत्तर विद्यार्थ्यांना बौद्धिक संपदा अधिकार व नवीन उद्योजकता निर्माण करण्यासंदर्भात सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. संदीप पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!