Headlines
Home » जळगाव » राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी महानगर मिडिया प्रमुखपदी गुलाबराव भदाणे

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी महानगर मिडिया प्रमुखपदी गुलाबराव भदाणे

जळगाव दि .११ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जळगाव येथील राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे कार्यकर्ते (शरद पवार गट) गुलाबराव जगन्नाथ भदाणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग महानगर मिडिया प्रमुख या पदावर नियुक्ती करण्यात आली .
सविस्तर वृत्त असे की पक्ष बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी, तसेच पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे.

गुलाबराव भदाणे यांना नियुक्तीबद्दल आर. पी. बाऱ्हे महानगराध्यक्ष सामाजिक न्याय विभाग जळगाव यांच्या स्वाक्षरीचे पत्र देते वेळी जिल्हाध्यक्ष- अॅड रविंद्र भैया पाटील, महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, जिल्हा सरचिटणीस- वाय. एस. महाजन, ग्रामीण जिल्हाध्यक्ष- अशोक सोनवणे, महानगर उपाध्यक्ष सामान्य न्याय विभाग- भाऊराव इंगळे, महानगर उपाध्यक्ष अल्पसंख्यांक विभाग- शब्बीर शाह, ग्रामीण जिल्हा संघटक- संजय जाधव, ग्रामपंचायत सदस्य- नामदेव पाटील ,कार्यालयीन सचिव- संजय चव्हाण आदी सर्व पदाधिकारी उपस्थित होते .
या निवडीबद्दल गुलाबराव भदाणे यांचे विविध स्तरावरुन अभिनंदन केले जात आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!