Headlines
Home » जळगाव » अनुभूती विद्यानिकेतनमध्ये ‘दिवाळी मेळावा’मध्ये चिमुकल्यांचे उद्योजकीय दर्शन

अनुभूती विद्यानिकेतनमध्ये ‘दिवाळी मेळावा’मध्ये चिमुकल्यांचे उद्योजकीय दर्शन

अनुभूती बाल निकेतन मधील दिवाळी मेळा चे दीपप्रज्वलन करून उदघाटन करताना अशोक जैन, अनिल कांकरिया, निशा जैन, मनोज परमार, अंबिका जैन.

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : अनुभूती विद्या निकेतन आणि अनुभूती बाल निकेतनद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातात. अनुभूती उद्यमिता कार्यक्रमाच्या अंतर्गत ‘दिवाळी मेळा २०२५’ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले होते. यात चिमुकल्यांनी विविध स्टॉल्स व्दारे उद्योजकीय दर्शन घडविले.

दिवाळी मेळ्यात मॉन्टेसरी आणि इयत्ता पहिलीच्या विद्यार्थांनी स्वतः तयार केलेले खाद्यपदार्थ, कला आणि हस्तकला उत्पादने, ग्रीटिंग कार्ड सह अन्य असे क्राऊन कॉर्नर, टेनी टेन्ट, सिंधी प्राऊड, आर दिवाळी किट, फ्रुटि ज्युस, वी-क्री फन अ मैना, क्राफ्ट कॉर्नर, क्युट कॉर्नर अशा २१ स्टॉल्स सादर केले. या उपक्रमातुन मुलांमध्ये वित्तीय साक्षरता, सर्जनशीलता आणि उद्यमशील विचारसरणीला प्रोत्साहन मिळाले.

दीपप्रज्वलनाव्दारे दिवाळी मेळाचे उदघाटन झाले. याप्रसंगी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, अनिल कांकरिया, अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन, अंबिका जैन, प्राचार्य मनोज परमार यांची उपस्थिती होती. यावेळी जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन, सहव्यवस्थापकिय संचालक अजित जैन, शोभना जैन, सहव्यवस्थापकिय संचालक अतुल जैन, डॉ. भावना जैन, अथांग जैन, अभंग जैन आणि जैन कुटुंबियांची उपस्थिती होते. सोबत पालक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. सुरवातीला गुरुवंदना व नवकार मंत्र विद्यार्थांनी म्हटला. त्यानंतर प्रेरणादायी नृत्य सादर करून चिमुकल्यांचनी मने जिंकले.

‘दिवाळी मेळा’ साठी सर्व तयारी आणि व्यवस्थापनात विद्यार्थांना पालकांची साथ होती. ‘लकी ड्रॉ’ मधील विजेत्यांना शोभना जैन यांच्याहस्ते पारितोषिक दिले. मुलांना विविध कौशल्य आत्मसात करता यावे? या उद्देशाने या दिवाळी मेळाचे आयोजन केले होते. यामुळे मुलांमध्ये सहकार्य, जबाबदारी आणि आत्मविश्वास वाढला.

‘आर दिवाळी गिफ्ट’ या स्टॉल्स वर आनंद घेताना अशोक जैन, अथांग जैन, अंबिका जैन, अभंग जैन

दिवाळी मेळा आयोजित करण्याबाबत निशा जैन यांनी सांगितले की, ‘मुलांनी उद्यमशीलतेचे मूलभूत तत्त्व समजून घेतल्यास त्यांच्यात सर्जनशील विचार, जबाबदारीची भावना आणि समस्यांचे समाधान करण्याची क्षमता विकसित होते. ही समज मुलांमध्ये उद्याचे आत्मविश्वासी नेतृत्व विकसीत करण्यास मदत करते; यातुनच दिवाळी मेळाचे आयोजन केल्याचे त्यांनी म्हटले.’

विद्यार्थी आहान यांच्या आई यांनी पालकांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. आभार अंबिका जैन यांनी मानले त्यावेळी त्या म्हणाल्या पहिल्यांदा सुरु केलेला आजच्या मेळाचे भव्य स्वरुप पाहता पुढेही असेच उपक्रम सुरु राहतील असे त्या म्हणाल्यात.

प्राचार्य मनोज परमार यांनी सांगितले की, पर्यावरणाचे संतुलित ठेऊन आर्थिक उन्नतीसाठी भविष्यातील उद्योजकीय पिढी तयार करण्याचे कार्य अनुभूती स्कूलव्दारे होत आहे. ‘सार्थक करूया जन्माचे रुप पालटु वसुंधरेचे’ या श्रध्देय भवरलाल जैन तथा मोठ्याभाऊंच्या विचारसरणीला धरूनच स्कूल तर्फे विविध उपक्रम राबवले जातात.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!