Headlines
Home » जळगाव » एकनाथ खडसेंचे अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन ;राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबतच राहणार

एकनाथ खडसेंचे अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन ;राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबतच राहणार

जळगाव ,दि.१३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – एकनाथ खडसे हे भाजपात प्रवेश करण्यास उस्तुक असल्याच्या चर्चा असल्याचे पत्रकारांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना विचारले असता त्यावर महाजन यांनी सांगितले की, याबाबत मला कुठलीही माहिती नाही. मात्र, एकनाथ खडसे हे वर दिल्लीवरून जोर लावून प्रयत्न करीत आहेत. याबाबत मला दिल्ली आणि राज्यातुन माहिती मिळाली. मला या संदर्भात कुठलीही विचारणा केलेली नाही. मी एक लहान कार्यकर्ता असे महाजन यांनी भाष्य केले.

एकनाथ खडसे यांनी मात्र गिरिश महाजन यांचा हा दावा फेटाळून लावला आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात राहणार असून कार्यकर्त्यांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, असं खडसे म्हणाले.

https://twitter.com/EknathGKhadse/status/1757240189439643692?t=4fhS_HyP4_FywVE7LLaARg&s=19

याबाबत एकनाथ खडसे यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट करुन माहिती दिली आहे. गेले काही दिवसांपासून मी भाजपा मध्ये प्रवेश करणार अशा अफवा माझ्याबद्दल संभ्रम निर्माण व्हावा, या हेतूने पसरविल्या जात आहेत. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात आहे व राहणार. कार्यकर्त्यांनी, आणि नागरिकांनी अशा अफवांकडे दुर्लक्ष करावे, असं आवाहन खडसे यांनी केलं आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!