Headlines
Home » जळगाव » एकलव्य क्रीडा संकुल जळगांव तर्फे विद्यार्थ्यांकरीता एडव्हेंचर्स टूर चे आयोजन

एकलव्य क्रीडा संकुल जळगांव तर्फे विद्यार्थ्यांकरीता एडव्हेंचर्स टूर चे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के.सी.ई. सोसायटी संचालित एकलव्य क्रीडा संकुल, जळगाव मार्फत ०१ एप्रिल ते ३१ मे २०२५ दरम्यान उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, यात विविध क्रीडा प्रकारांचे शास्त्रशुद्ध व परिचय प्रशिक्षण देण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून एकलव्य क्रीडा संकुल तर्फे ११ व १२ मे २०२५ दरम्यान एकलव्य क्रीडा प्रशिक्षण शिबिरातील विद्यार्थ्यांकरिता मेळघाट व्याघ्र प्रकल्प येथे एडवेंचर टूर २०२५ चे आयोजन करण्यात आले होते.

या कॅम्पकरिता फक्त विद्यार्थी खेळाडूच नव्हे तर त्यांच्या पालकांचा सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या एडवेंचर टूर्समध्ये जंगल सफारी, नाईट कॅम्प, कॅम्प फायर तसेच तेथील प्रसिद्ध अशा देवी पॉईंट, पंचबोल पॉईंट इ. ठिकाणी  भेट देण्यात आली. या कॅम्पद्वारे शिबिरातील प्रशिक्षणार्थी खेळाडू विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या प्राण्यांचे तसेच जंगलातील पशु, पक्षी व जंगलातील दुर्मिळ अशा झाडांचे, रोपांचे परिचय करून देण्यात आले.

सदर चिखलदरा एडवेंचर टूर कॅम्प २०२५ हा एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेला होता. या या एडवेंचर टूरला यशस्वी करण्यासाठी उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे शिबीर प्रमुख डॉ. रणजीत पाटील तसेच प्रा. प्रणव बेलोरकर, एकलव्य क्रीडा संकुलातील लेखापाल राजेंद्र नारखेडे, अंकुश तेली, योगेश चव्हाण तसेच शिबिरातील सहाय्यक प्रशिक्षक यांचे अनमोल सहकार्य लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!