Headlines
Home » महाराष्ट्र » उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रक्तदान करुन केले नववर्षाचे स्वागत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रक्तदान करुन केले नववर्षाचे स्वागत

ठाणे ( वास्तव पोस्ट ) : धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेले तसेच शिवसेना ठाणे शाखा आणि ‘रक्तानंद’ ग्रुपच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराचे यंदा ३० वे वर्ष असून यानिमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रक्तदान करून २०२५ या नवीन वर्षाचे स्वागत केले.

यावेळी दरवर्षी या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना ‘रक्तानंद’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यासोबतच या शिबिरात रक्तदान करणाऱ्या ठाणे शहरातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. तसेच पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी तयार केलेल्या दिनदर्शिकांचे अनावरणही करण्यात आले.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना म्हटले की, आगामी वर्ष हे सर्वांना सुख, समाधान आणि आनंद देणारे ठरो.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!