गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे युवा श्रम संस्कार व व्यक्तीमत्त्व विकास शिबीर

जळगाव | दि.५ ( वास्तव पोस्ट न्यूज) धरणगाव तालुक्यातील बोरखेडा येथील श्री महामंडलेश्वर स्वामी लोकेशानंद महाराज सेवाश्रम या ठिकाणी पाच दिवशीय निवासी युवा संस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे. निवासी युवा श्रम संस्कार व व्यक्तीमत्त्व विकास शिबीराच्या उद्घाटनाप्रसंगी ज्येष्ठ गांधीयन अब्दुलभाई, सरपंच डॉ. विजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य संजय कोळी,…

Read More

सिटू संघटनेच्या वतीने नाशिक जिल्ह्यात “कामगार दिन” जल्लोषात साजरा

नाशिक | दि.२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – महाराष्ट्र कामगार दिना निमित्त नाशिक जिल्ह्यात खुटवड नगर, सातपूर,नाशिक रोड, सिन्नर, मालेगांव, घोटी,व दिंडोरी या विभागांमध्ये सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राज्य अध्यक्ष डॉ.डी.एल.कराड यांच्या नेतृत्वाखाली १ मे महाराष्ट्र कामगार दिना निमित्त झेंडावंदन करून कामगार दिन साजरा करण्यात आला. तसेच केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणावर देखील चर्चा…

Read More

जळगाव येथे भगवान महावीर स्वामी यांचा 2623 वा जन्म-कल्याणक महोत्सव आरंभ

जळगाव | दि.१८ ( वास्तव पोस्ट न्यूज )– सकल जैन भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव समिती २०२४ यांच्या अंतर्गत सकल दिगंबर जैन समाजाच्या विश्व शांति, सदभावना व मतदान जनजागृति बाइक रॅलीने भगवान महावीर स्वामी यांचा २६२३ वा जन्म-कल्याणक महोत्सव आरंभ झाला. खानदेश सेंट्रल प्रांगणा पासून ही रॅली सुरु झाली. पारस राका यांनी मनोगत व्यक्त केले….

Read More

वैशालीताई सुर्यवंशी यांनी घेतला संदल उत्सवात सहभाग

पाचोरा | दि. १८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – शहरातील मानसिंगका मार्केटमध्ये आज आयोजीत करण्यात आलेल्या पीर सैयद गयबान शहावली यांच्या संदल-ए-मुबारक उत्सवात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी सहभागी होत आशीर्वाद घेतला. पाचोर्‍यासह परिसरातील हिंदू व मुस्लीम ऐक्याचे प्रतिक म्हणून पीर सैयद गयबान शहावली या धार्मिक स्थळाची ख्याती आहे….

Read More

‘भारत मुक्ती मोर्चा’ आणि ‘बहुजन क्रांती मोर्चा’ कडून जिल्हाधिकारी जळगाव यांना ईव्हीएम विरोधात निवेदन सादर

जळगाव | दि.१७ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – निवडणुका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घ्याव्यात या मागणीसाठी भारत मुक्ती मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चाच्या संलग्न संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जळगाव जिल्हाधिकारी यांना “ईव्हीएम विरोधात” निवेदन दिले. सदर निवेदनात म्हटले आहे की, प्रत्येक निवडणुकीत मतदार हा मतपत्रिकेनेच मताधिकार बजावेल हा कायदा भारतीय संसदेने लोक प्रतिनिधित्व अधिनियम १९५९ नियम…

Read More

जैन इरिगेशन सिस्टीम लि.तर्फे शहर पोलीस स्टेशनमधील कैद्यांसाठी सतरंजी, चादर सुपूर्द

सतरंजी, चादर सुपूर्द करताना चंद्रकांत जैन, अनिल जोशी, दीपककुमार गुप्ता, पोलिस निरीक्षक अनिल भवारी जळगाव | दि.१७ ( वास्तव पोस्ट न्यूज )– राम नवमीच्या निमित्ताने जळगाव शहर पोलिस स्टेशनच्या लॉकअप मधील कैद्यांना अंथरण्यासाठी सतरंजी व पांघरूण म्हणून सोलापुरी चादर देण्यात आल्या. यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार पी. गुप्ता, जैन इरिगेशनचे चंद्रकांत जैन, अनिल जोशी यांच्या…

Read More

बाबासाहेब फक्त दलितांचे नव्हे, तर सर्व समाज घटकांचे कैवारी; प्रा.डॉ.सत्यजित साळवे यांचे प्रतिपादन

जळगाव | दि.१७ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – शहरातील विवेकानंद नगर येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त प्रा. डॉ.सत्यजित साळवे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. थोरांची ओळख इयत्ता तिसरीच्या पुस्तकात ‘दलितांचे कैवारी’ हा धडा आमच्या पिढीला शिकवला गेला. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलितांचे कैवारी होते, असा संबोध मनात पक्का झाला. त्यामुळे इतर…

Read More

यंदाच्या ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराचे मानकरी अमिताभ बच्चन

मुंबई | दि.१७ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जगविख्यात पार्श्वगायिका ‘गानसम्राज्ञी’ दिवंगत लता मंगेशकर यांच्या नावे दिल्या जाणाऱ्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराचे मानकरी म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांच्या नावाची घोषणा झाली आहे. २४ एप्रिलला, मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या ८२ व्या स्मृतिदिनाचं औचित्य साधत मुंबईमध्ये मा. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन…

Read More

शिरखुर्मा पार्टीत वैशालीताई सुर्यवंशी यांचा सहभाग

भडगाव |१५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – येथे पवित्र रमजान ईदनिमित्त आयोजीत शिरखुर्मा पार्टीत शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी सहभागी होऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. अलीकडेच पवित्र रमजान ईद उत्सव अतिशय चैतन्यदायी वातावरणात साजरा झाला होता. यानिमित्ताने भडगावात हिंदू-मुस्लिम बांधवांसाठी शिरखुर्मा पार्टीचे आयोजन राष्ट्रवादी अल्पसंख्याक शहराध्यक्ष शेरखान पठाण यांनी केले होते….

Read More

माहिती अधिकारात माहिती न मिळाल्याने सामाजिक कार्यकर्ता दिनेश भोळे यांचे जळगाव जिल्हा परिषदे समोर बेमुदत ठिय्या आंदोलन

जळगाव | दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज )– जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद, जळगाव हे माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याच्या निषेधार्थ माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी जिल्हा परिषद समोर आज सकाळपासून ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. सविस्तर वृत्त असे की, गेल्या वर्षभरापासून जिल्हा आरोग्य अधिकारी विभाग जळगाव यांचेकडे माहिती अधिकारात दिनेश भोळे यांनी अर्ज…

Read More

‘स्वराज्य नवनिर्माण फाऊंडेशन’चा तरूणींसाठी मोफत लाठीकाठी प्रशिक्षणाचा समारोप

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांची उपस्थिती… अकोला | दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) -राष्ट्रीय विचाराने प्रेरित असलेल्या अकोला येथील ‘स्वराज्य नवनिर्माण फाउंडेशन’च्या वतीने आयोजित १० दिवसीय महिला मुलींसाठी मोफत लाठीकाठी प्रशिक्षण शिबिर अकोला येथे भारत विद्यालय क्रीडांगणावर पार पडले. या दहा दिवसीय शिबिराचा जवळपास एक हजार महिला, मुलींनी लाभ…

Read More

बोरखेडा येथे भीम जयंती उत्साहात साजरी

धरणगाव | दि.१४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – तालुक्यातील बोरखेडा येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती जल्लोषात आणि उत्साहात साजरी करण्यात आली. सुरुवातीला बोरखेडा ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि माल्यार्पण बोरखेडा गावाचे सरपंच डॉक्टर विजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य पूजा सत्यजित साळवे, ग्रामपंचायत सदस्य संजय कोळी यांच्या हस्ते…

Read More

सामाजिक क्रांतिचे शिल्पकार…

महामानव, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यासंगी विद्वान होते. त्यांचे विचार चिरंतन राहिले आहेत. शाश्वत विचारांची शिदोरी देणा-या या युगपुरुषासमोर जगातील सर्व लोक आदराने नतमस्तक होतात. सामाजिक विषमतेविरुद्ध यशस्वी लढा देऊन हजारो वर्षापासून अंधारात गडप झालेल्या मूक समाजाला जागृत करण्याचे अलौकिक कार्य डॉ. आंबेडकरांनी केले. कुत्र्या- मांजरापेक्षाही हीन जीवन जगणाऱ्या अखिल वंचित समाजाला “शिका, संघटित व्हा…

Read More

जळगावात महिलांच्या भव्य दुचाकी रॅलीने वेधले लक्ष

जळगाव | दि. १३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती तर्फे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सप्ताह सोहळ्याची मोटारसायकल रॅलीने सुरवात करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती तर्फे आज समितीचे अध्यक्ष संदीप भाऊ शिरसाठ व उप उप अध्यक्षा भारती रंधे यांच्या…

Read More

महात्मा फुले जयंतीप्रसंगी, “शिक्षण हेच परिवर्तन घडवून आणण्याचे शस्त्र आणि शास्त्र” :आरपीआय जिल्हाध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी यांचे प्रतिपादन

जळगाव | दि.११ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा भव्य जयंती सोहळा साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी उपस्थित होते. महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रताप गुलाबराव पाटील जिल्हा परिषद सदस्य, पवन सोनवणे, डॉ.मिलिंद बागुल…

Read More
error: Content is protected !!