Headlines
Home » सामाजिक » यंदाच्या ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराचे मानकरी अमिताभ बच्चन

यंदाच्या ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराचे मानकरी अमिताभ बच्चन

मुंबई | दि.१७ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जगविख्यात पार्श्वगायिका ‘गानसम्राज्ञी’ दिवंगत लता मंगेशकर यांच्या नावे दिल्या जाणाऱ्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराचे मानकरी म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांच्या नावाची घोषणा झाली आहे. २४ एप्रिलला, मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या ८२ व्या स्मृतिदिनाचं औचित्य साधत मुंबईमध्ये मा. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जाणार आहे. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या हस्ते अमिताभ बच्चन यांच्यासह इतर दिग्गजांचा पुरस्काराने गौरवीले जाणार आहे.

अमिताभ बच्चन यांना ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ जाहीर झाल्यानंतर सिनेसृष्टीतून अमिताभ बच्चन यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अमिताभ बच्चन आणि दिवंगत गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं एक वेगळंच नातं होतं. कारण अमिताभ यांच्या अनेक चित्रपटात लता मंगेशकर यांनी गाणी गायली आहेत. तसेच अमिताभ बच्चन हे लतादीदींचा आईप्रमाणे आदर करत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!