कान्ह ललित कला केंद्रातर्फे ३ रोजी ‘वाघमार्या जानकीराम’ नाट्य प्रयोग ; अस्सल अहीराणी भाषेत
जळगाव (वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित कान्ह ललित कला केंद्रातर्फे पहिल्यांदाच मनोज पाटील लिखित आणि हास्यजत्रा फेम हेमंत पाटील दिग्दर्शित ‘वाघमार्या जानकीराम’ या नाटकाच्या निमित्ताने व्यावसायिक निर्मितीत पाऊल ठेवण्यात येत आहे. पुण्यात स्थायिक असलेल्या खास खान्देशातील रसिक प्रेक्षकांसाठी ३ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजता चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात या नाटकाचा…
