कान्ह ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासुन साकारले १०८ गणपती
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के.सी.ई. सोसायटीच्या कान्ह ललित कला केंद्र व ओजस्विनी कला महाविद्यालय जळगाव, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चला मातीचे गणपती बनवूया या तीन दिवसीय शालेय विद्यार्थ्यांच्या कार्यशाळेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. कार्यशाळेतील सहभागी विद्यार्थ्यांनी मातीच्या १०८ गणपतीच्या मूर्त्या कल्पक रित्या साकारल्या. तीन दिवसीय कार्यशाळेच्या माध्यमातून शाडू माती पासून गणपती तयार करताना,…
