Headlines
Home » जळगाव » एमबीबीएससाठी आर्या पाटीलची निवड ; नीट परीक्षेत ५६९ गुण

एमबीबीएससाठी आर्या पाटीलची निवड ; नीट परीक्षेत ५६९ गुण

वरणगाव ( वास्तव पोस्ट ) : येथील महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थिनी आर्या राजेश पाटील हिने वैद्यकीय प्रवेशासाठी होणाऱ्या नीट परीक्षेत ५६९ गुण मिळवत यश संपादन केले आहे. या उल्लेखनीय यशामुळे तिची निवड मुंबई येथील प्रतिष्ठित नायर मेडिकल कॉलेजमध्ये झाली आहे.

या यशाबद्दल आर्या पाटील व तिचे वडील केंद्रप्रमुख राजेश पाटील यांचा गौरव महाराष्ट्र राज्य विज्ञान अध्यापक महामंडळाचे सहसचिव सुनील वानखेडे तसेच गटसाधन केंद्रातील विषयतज्ज्ञ शिक्षक संजय गायकवाड यांनी केला. यावेळी आर्याला पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!