Headlines
Home » जळगाव » महिला आघाडी लोकसभा समन्वयक पदी शितल चिंचोरे यांची नियुक्ती

महिला आघाडी लोकसभा समन्वयक पदी शितल चिंचोरे यांची नियुक्ती

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : म्हसावद येथील माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शितल दिपक चिंचोरे यांची शिवसेना पक्षाच्या (शिंदे गट) महिला आघाडी लोकसभा समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली असून जळगाव लोकसभा कार्यक्षेत्रातील जबाबदारी त्यांच्याकडे असणार आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शीतल चिंचोरे यांना या आशयाचे नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पक्षाचे अनेक पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. सदर नियुक्ती पत्रावर मीनाताई कांबळे डॉ.मनीषा कायंदे भाऊसाहेब चौधरी यांच्या स्वाक्षरी आहेत. या नियुक्तीमुळे शीतल चिंचोरे यांच्यावर म्हसावद गावातून तसेच परिसरातील ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!