Home » जळगाव » एस.एस. मणियार विधी महाविद्यालयात एक दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन

एस.एस. मणियार विधी महाविद्यालयात एक दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : येथील एस.एस. मणियार विधी महाविद्यालयात बौद्धिक संपदा सायबर सुरक्षा आणि न्यायव्यवस्थेतील कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका या विषयावर दि २२ फेब्रुवारी रोजी एकदिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.

या चर्चासत्राचे उद्घाटन सत्रास प्रमुख पाहुणे म्हणून जळगावचे जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनयना आर. भांगडिया झवर हे असणार आहेत. यावेळी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव च्या इंक्युबॅशन इनोवेशन अँड लिंकेजसचे संचालक प्रो. डॉ. जावळेकर राजेश बाबुराव यांची सन्माननीय उपस्थिती लाभणार आहे. चर्चासत्राचे बीज भाषण कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या बौद्धिक संपदा विभागाचे समन्वयक प्रो.डॉ. विकास गीते हे देणार आहेत. या उद्घाटन सत्राचे अध्यक्षस्थान खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव ॲड. प्रवीणचंद्र जंगले हे भूषविणार आहेत.

चर्चासत्राच्या समारोप समारंभास कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. समीर नारखेडे हे प्रमुख पाहुणे असतील. यावेळी मूळजी जेठा महाविद्यालयातील इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. बी.एन. केसुर यांची सन्माननीय उपस्थिती लाभणार आहे.

चर्चासत्राच्या तांत्रिक सत्रास कल्याण येथील बी.के. बिर्ला कॉलेज ऑफ आर्ट, सायन्स अँड कॉमर्स प्राणीशास्त्र विभागाचे सहयोगी प्रा. डॉ. कांतीलाल नगरे, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव चे प्राचार्य डॉ. सुहास एस. गाजरे हे या विषयावरील तज्ञ मार्गदर्शक असतील. या तांत्रिक सत्रातील अध्यक्षस्थान केसीई व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालय जळगाव चे प्रा. अनिलकुमार पांडुरंग मारथी, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विधी शाखेचे सहअधिष्ठाता आणि धुळे येथील आंबेडकर लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. विजय बहीराम हे भूषविणार आहेत. तांत्रिक सत्र तीन मध्ये राज्यभरातील पन्नास हुन अधिक संशोधक आपले संशोधन लेख सादर करणार आहेत.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार रेड्डी यांनी चर्चा सत्रात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून यशस्वी करण्याचे आवाहन केले. चर्चासत्राचे समन्वयक डॉ. डी. आर. क्षीरसागर, डॉ. रेखा पाहूजा, प्रा. गणपत धुमाळे, डॉ. योगेश महाजन, डॉ. अंजली बोंदर, डॉ. विजेता सिंग, प्रा. शरद चव्हाण, प्रा. अमिता वराडे, प्रा. बी. एस. पाटील, प्रा. नितीन मटकरी, डॉ. ज्योती भोळे, प्रा. स्वाती लोखंडे हे चर्चासत्राच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!