Home » जळगाव » केंद्रीय संस्कृत मेधावी शिष्यवृत्तीसाठी ३१ विद्यार्थ्यांची निवड

केंद्रीय संस्कृत मेधावी शिष्यवृत्तीसाठी ३१ विद्यार्थ्यांची निवड

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, नवी दिल्लीद्वारा संपूर्ण देशभरात संस्कृत भाषा आणि साहित्याच्या प्रचार-प्रसारासाठी आणि समृद्धीसाठी दिल्या जाणाऱ्या केंद्रीय संस्कृत मेधावी शिष्यवृत्तीसाठी खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयामधील ३१ विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. केंद्रीय संस्कृत विद्यापीठाद्वारे संस्कृत भाषेच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या जातात.

संपूर्ण देशभरातील संस्कृत विषयात दैदिप्यमान यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारावर विद्यापीठामार्फत प्रति विद्यार्थ्यांस वार्षिक ६००० रुपयांची संस्कृत मेधावी शिष्यवृत्ती देण्यात येते. सदर शिष्यवृत्तीसाठी सालाबादप्रमाणे यंदाही गौरवशाली परंपरा कायम राहत महाविद्यालयातील ३१ विद्यार्थ्यांची निवड झाल्याचे विद्यापीठाद्वारे नुकतेच अधिकृत पत्रान्वये कळविण्यात आलेले आहे.

शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, प्राचार्य डॉ.सं.ना.भारंबे, उपप्राचार्य प्रा. के.जी. सपकाळे, पर्यवेक्षक प्रा.आर.बी. ठाकरे, समन्वयक प्रा. स्वाती बऱ्हाटे, प्रा. उमेश पाटील, विषय शिक्षक प्रा.अर्जुनशास्त्री मेटे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केलेले आहे. तसेच सर्व कार्यालयीन कार्यासाठी वरीष्ठ लिपिक मंगेश नेवे व युवराज पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!