वरणगाव ( वास्तव पोस्ट ) : शहरातील रामपेठ भागातील संत रविदास नगर मध्ये संत रविदास यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी तरुण मुलांनी देशाप्रती व समाजाप्रती एकनिष्ठ राहून संत रविदास यांचे विचार अंगीकारून स्वतःची प्रगती करत इतरांना देखील या विचारांनी प्रेरित करण्याचा निर्धार करून संत रविदास यांची जयंती साजरी केली.
संत रविदास नगरामध्ये बुधवारी सायंकाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकारे, चंद्रकांत बढे माजी नगर अध्यक्ष सुनील काळे, माजी नगरसेवक राजेंद्र चौधरी, नामदेव मोरे, माजी सरपंच सतीश चंदने आदि उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत रविदास नगराचे फलकाचे अनावरण करण्यात आले. यानंतर संत रविदास यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर चंद्रकांत बढे म्हणाले की संत रोहिदास यांनी समाजातील विषमता व जातीभेद दूर करण्याचा प्रयत्न केला. सुनील काळे यांनी सांगितले की, समाजातील भेदभाव दूर केले पाहिजे एकोप्याने राहिले पाहिजे. हाच संदेश रोहिदासांनी दिला.
तरुणांचा संत रोहिदासांचे विचार अंगीकरण्याचा निर्धार
एकविसाव्या युगामध्ये तंत्रज्ञानाचे युग असले तरी आजची पिढी ही वाचनापासून दूर जात असून मोबाईलच्या आहारी गेली आहे. परंतु संत रोहित संजय विचार अंगीकारून त्याचा प्रचार व प्रसार करायचा व प्रत्यक्ष जीवनात अंगीकारण्याचा निर्धार समाजातील तरुणांनी यावेळी केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र परसे यांनी तर आभार शैलेंद्र अहिरे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व समाजाच्या बांधवांनी परिश्रम घेतले.
