ऐनपूर ( वास्तव पोस्ट ) : ता रावेर येथील पुर्नवसन संघर्ष समितीच्या वतीने येथील सुस्ती तापी नदी पात्रात जल समाधी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास पूर्नवसनचे उप अभियंता बागुल यांनी भेट देवून आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतले. आंदोलकांना आश्वासन मिळाल्यानंतर सहा तासांनंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
दरम्यान पुर्नवसन संघर्ष समिती गेल्या दहा वर्षा पासून राहिलेली घरं तसेच नविन पाठविलेल्या २५० घरांचे तात्काळ पुर्नवसन करण्यात यावे, या मागणीसाठी संबधीत विभागास वेळोवेळी कागद पत्रे दिलेले असतांना देखील वरिष्ठ अधिकारी दखल घेत नव्हते. त्यामुळे दि ११ रोजी सुलवाडी येथील सुस्ती परीसरातील तापी बॅक वॉटर मध्ये जलसमाधी आंदोलन करण्यात आले.
सकाळी ९ वाजता बसस्थानकावरील सरदार पटेल यांच्या पुतळ्यास हार घालून वाजत गाजत पूर्नवसन संर्घष समितीने तापी नदीकडे मार्गक्रमण करत पाण्यात उतरून महिला आणि पुरुषांनी आंदोलन केले. यावेळी परिसरातील भांबलवाडी, वाघाडी, नेहता, ऐनपूर या गावातील लोकांनी आंदोलनात सहभाग घेतला. जो पर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याच्या घोषणा यावेळी आंदोलकांनी देत वरिष्ठांनी आमच्या मागण्या पूर्ण कराव्या यावर ठाम राहिले.

प्रशासनाच्या वतीने आंदोलन मागे घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. परंतू ठोक आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, यावर आंदोलक ठाम राहीले. अखेर उप कार्यकारी अभियंता बागुल यांनी आंदोलनास भेट देवून म्हणणे ऐकून घेतले. आंदोलनकर्ते व मी स्वतः तुमच्या सोबत मंत्र्यालयात येतो आणि त्याठिकाणी पूर्नवसन मंत्री सोबत बैठक घेऊन आपला पूर्नवसनाचा मार्ग मोकळा करू, असे लेखी आश्वासन देवून आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी रावेर तहसिलदार बंडू कापसे, ऐनपूर मंडळ अधिकारी गजेद्र शेलकर, तलाठी शरद सूर्यवशी, कोतवाल नयना अवसरमल, खिर्डी सर्कल प्रविण नेहेते, बलवाडी तलाठी अश्वीनी हंडे, काडवेल तलाठी शाम तिडके, कोतवाल तुषार पाटील, ऐनपूर ग्रामविकास अधिकारी सुनिल गोसावी यांसह अधिकारी उपस्थितीत होते. तर यावेळी निंभोरा पोलिस स्टेशनचे स.पो.नि. हरिदास बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक सावळे व पोलिस कर्मचारी यांनी चोख बरोबस्त ठेवला. ऐनपूर सरपंच अमोल महाजन स्वतः आंदोलनकर्त्यांच्या मागण्यासाठी तापी नदीत पात्रात ६ तास आंदोलन केले.
दरम्यान आंदोलन सुरु असतांना शेख राजू शेख सुभान यांचा तोल जाऊन ते पाण्यात पडले. त्यांच्या नाका तोंडात पाणी गेल्याने ते बेशुद्ध पडले. सदर बाब इतर आंदोलकांच्या लक्षात येताच त्यांना त्वरीत बाहेर काढण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य शेख शफी, शेख रशीद, शेख हारुन, जलील खान, शेख आक्रम यांनी त्यांना रुग्ण वाहीकेतून प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ.नितीन परदेशी यांनी शेख राजू शेख शेख सुभान यांच्यावर उपचार केले.
