Home » जळगाव जिल्हा » शेतकऱ्यांच्या सुविधा हाच सरकारचा प्राधान्यक्रम : पालकमंत्री पाटील

शेतकऱ्यांच्या सुविधा हाच सरकारचा प्राधान्यक्रम : पालकमंत्री पाटील

कासोदा उपबाजार समितीत ५० लाखांच्या काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते संपन्न

धरणगाव ( वास्तवपोस्ट ) : “शेतकऱ्यांना आधुनिक आणि उत्तम बाजारपेठ उपलब्ध व्हावी, त्यांच्या सोयीसाठी बाजार समित्यांचे आधुनिकीकरण केले जात आहे. कासोदा उपबाजाराचा काँक्रिटीकरणामुळे बाजारात येणाऱ्या शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना सोईचे होणार असून बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातील.” शेतकऱ्यांच्या सुविधा हाच सरकारचा प्राधान्यक्रम असल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

कृषी उत्पन्न बाजार समिती धरणगाव अंतर्गत उपबाजार कासोदा, तालुका एरंडोल येथे ५० लाख रुपये निधीतून काँक्रिटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी आमदार अमोल पाटील, जे.डी.सी.सी. बँकेचे चेअरमन संजय पवार, मार्केटचे चेअरमन जिजाबराव पाटील, शेतकी संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, जिल्हा प्रमुख वासुदेव पाटील, सुभाष अण्णा पाटील, उप जिल्हाप्रमुख पी.एम. पाटील, माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, माजी सभापती गजानन नाना पाटील, उपसभापती किरण पाटील, संचालक ज्ञानेश्वर माळी, संचालक ईश्वर पाटील व सचिव नवनाथ तायडे, तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, संजय पाटील, दिलीप महाजन, संचालक रघुनाथ पाटील, देविदास चौधरी, भाऊसाहेब पाटील, नितीन करवा, संजय काबरा, रवी पाटील, दिलीप धनगर यांच्यासह पदाधिकारी, शेतकरी व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आ.अमोल पाटील, जेडीसी बँकेचे चेअरमन संजय पवार, शेतकी संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्र्वर महाजन व भाजपचे सुभाषआण्णा पाटील यांनी देखील आपल्या मनोगतातून बाजार समितीच्या विकासासाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृ.ऊ. बा. चे संचालक सुदाम पाटील . प्रस्ताविक सभापती जिजाबराव पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन माजी सभापती गजानननाना पाटील यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!