Headlines
Home » जळगाव » प्रा.उमेश ठाकरे यांच्या हस्ते भूगोल मंडळाचे उद्घाटन

प्रा.उमेश ठाकरे यांच्या हस्ते भूगोल मंडळाचे उद्घाटन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : भूगोल दिनाचे औचित्य साधून प्रमुख अतिथी प्राध्यापक उमेश ठाकरे स्वामी विवेकानंद विद्यालय (स्वायत्त्य) जळगाव यांच्या हस्ते भूगोल मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रा. ठाकरे यांनी भूगोल दिनाचे महत्त्व, भौगोलिक माहिती त्याचबरोबर सूर्याचे भासमान भ्रमण इत्यादी विषयी माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.केतन चौधरी होते. त्यांनी भूगोलाचा इतर विषयाशी कसा समन्वय साधला जातो, प्रत्येक विषय हा एकमेकांशी कसा पूरक असतो हे समजावून सांगितले आणि स्वतः परीक्षण करायला सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. वंदना चौधरी यांनी भूगोलाचे महत्व आणि मकर संक्रांत सूर्याचा मकर राशित कसा प्रवेश होतो, त्याचबरोबर तीळ आणि गूळ यांचे महत्त्व सांगितले. तसेच यावेळी त्यांनी पाहुण्यांचा परिचय व आभार मानले.

कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक वृंद उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अशोक राणे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!