जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज ऑफ एजुकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग महाविद्यालयात व्यवस्थापन विभागातर्फे प्रजासत्ताक दिना निमित्त पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या पोस्टर प्रदर्शना मध्ये विद्यार्थ्यांनी डिजिटल इंडिया, बदलता भारत, आत्मनिर्भर भारत, या विषयांवर आधारित पोस्टर सादरीकरण केले.
पोस्टर प्रदर्शन चे आयोजन व्यस्थापन विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक तान्या भाटिया यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयातून ३३ विद्यार्थांनी सहभाग घेतला . पोस्टर प्रदर्शनाला परीक्षक म्हणून प्रा.अविनाश सूर्यवंशी व प्रा.कल्पेश महाजन यांचे सहकार्य लाभले.
पोस्टर प्रदर्शन बघण्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. केसीई इंजिनीरिंग अँड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय सुगंधी यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . पोस्टर प्रदर्शन कार्यक्रमातून ६ ग्रुप मधून तनुश्री पाटील, वेदाली राणे, ख़ुशी पाटील, श्रुती ठाकूर, जिगीषा भारंबे, सायली केळकर, कृष्णा जाला, नंदिनी पाटील, नवीन दत्त, दिव्या चौधरी, ख़ुशी नारखेडे, लीना चौधरी, याना पारितोषिक देण्यात आले.
वैयक्तीक सहभाग स्पर्धेत गायत्री चौधरी व साक्षी सोनवणे यांना पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमाला एमबीए विभाग प्रमुख प्रा.हर्षा देशमुख, एबीएम विभाग प्रमुख डॉ.वीणा भोसले, प्रा.गणेश पाटील, प्रा.श्रुतिका घरडे, प्रा.डिगंबर सोनवणे, प्रा.कोमल जैन, प्रा.हेमंत धनंधरे, प्रा.मकरंद गोडबोले, प्रा.रेवती पाटील, प्रा.देवेंद्र पाटील, प्रा.प्राची पानपाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे समनव्यक विद्यार्थी भावेश भन्साली, आयुषी ओचानी, प्रतीक्षा महाजन, हर्ष कोटेचा, हर्ष ओचानी होते .
