Headlines
Home » महाराष्ट्र » शिक्षणमंत्री दादा भूसे यांच्या सोबत राज्यातील शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

शिक्षणमंत्री दादा भूसे यांच्या सोबत राज्यातील शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : आज मुंबईतील जय हिंद कॉलेज येथे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, आणि कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.

या बैठकीत गुणवत्तापूर्ण आणि आनंददायी शिक्षणाच्या दृष्टीने शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांवर सखोल चर्चा करण्यात आली. या प्रसंगी ६३ शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. शिक्षकांच्या विविध समस्या समजून घेण्यात आल्या व त्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी मंत्री महोदयांनी सकारात्मक दृष्टिकोनातून चर्चा केली.

यावेळी प्रधान शिक्षण सचिव रणजितसिंह देओल, माजी शिक्षण सचिव नंदकुमार, शिक्षण आयुक्त सचिंद्रसिंग प्रतापसिंह, प्रकल्प संचालक राहुल रेखावार, उपसचिव तुषार महाजन, संचालक शरद गोसावी, संचालक कृष्णकांत पाटील, तसेच संपत सूर्यवंशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

राज्यातील शिक्षण क्षेत्रात अधिक सुधारणा घडवून आणण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. या बैठकीत शिक्षण क्षेत्रातील नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी शिक्षण विभागाच्या आगामी धोरणांवर चर्चा करण्यात आली, ज्याचा फायदा राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना होईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!