Headlines
Home » जळगाव » पोलिस अधिक्षक यांना ठाकरे गटाकड़ून मनपा अभियंता मारहाण प्रकरणी निवेदन

पोलिस अधिक्षक यांना ठाकरे गटाकड़ून मनपा अभियंता मारहाण प्रकरणी निवेदन

जळगाव दि. ७ ( वास्तव पोस्ट न्यूज़ ) – जळगांव महानगर पालिका अभियंता यांना जळगाव येथे मारहाण झाली होती . याप्रकरणी मारहाण करणाऱ्या आरोपीस अद्याप अटक झालेली नसुन आरोपीस ताबड़तोब अटक करावी या मागणीचे एक निवेदन मा. गजानन मालपुरे ,जळगाव जिल्हा संघटक शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ) यांचेकड़ून आज ०७ रोजी पोलीस अधिक्षक जळगांव यांना देण्यात आले.

सदर निवेदनात म्हटले आहे की जळगांव महानगरपालिका अभियंता मा. प्रसाद पुराणीक यांना मारहाण करणारा आरोपी सलग ३ दिवसांपासून फरार आहे. सदरील आरोपी याने यापुर्वी ही अशा प्रकारची दादागिरी व गुंडागर्दी केलेली आहे.

तसेच आरोपीमुळे जळगांव महानगर पालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग भयभीत झालेले आहेत. सदरील घटना ही गंभीर स्वरूपाची असल्याने या घटनेची दखल घेऊन या आरोपीस लवकरात लवकर अटक करून त्याच्यावर कायदेशिर कडक कारवाई करण्यात यावी. अन्यथा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल ,असे या निवेदनात म्हटले आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!