अमळनेर तालुक्यात विकास कामांमध्ये विद्यार्थी हिताला प्राधान्य ; मंत्री श्री अनिल पाटील
अमळनेर दि. ५ ( पतिनिधी ) – सामाजिक न्याय विभागाच्या मुलींचे शासकीय वसतिगृह इमारतीचे लोकार्पण संपन्न सुसज्ज इमारतीत १०० विद्यार्थिनींना लाभ मिळणार आहे .शासनाने समाजातील वंचित घटकाच्या विकासासाठी प्राधान्य दिले असून शासकीय वसतिगृहांमुळे विद्यार्थिनींची शिक्षणाची वाट सुकर होणार असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री श्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. समाज कल्याण विभागाच्या वतीने अमळनेर येथे उभारण्यात आलेल्या १०० विद्यार्थिनी क्षमतेच्या मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृह इमारतीचे उद्घाटन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज रोजी करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते.
राज्यात मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली विकासाची घोडदौड सुरू असून अंमळनेर तालुक्यात विकास कामांमध्ये विद्यार्थी प्राधान्य दिले असल्याचे प्रतिपादन आपत्ती व्यवस्थापन व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
याप्रसंगी माजी नगराध्यक्षा श्रीमती.जयश्री पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, डॉ.इंद्राणी मिश्रा, समाज कल्याण नाशिक विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ, उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, समाज कल्याणचे सहायक आयुक्त योगेश पाटील हे उपस्थित होते .
सदर सोहळा यशस्वीपणे करण्यासाठी समाज कल्याण विभागाचे अधिकारी तसेच कार्यालयीन अधीक्षक श्री.राजेंद्र कांबळे, शासकीय वसतिगृहाचे गृहपाल श्री.धनंजय सपकाळे, समाज कल्याण निरीक्षक, तालुका समन्वयक, समतादूत व इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
