Headlines
Home » सांस्कृतिक » साहित्यिक पद्मश्री आदरणीय श्री. गिरीशजी प्रभुणे यांचेकडून समतोल प्रकल्पाच्या कार्याची प्रशंसा

साहित्यिक पद्मश्री आदरणीय श्री. गिरीशजी प्रभुणे यांचेकडून समतोल प्रकल्पाच्या कार्याची प्रशंसा

जळगाव दि. ३ ( प्रतिनिधी )– आज दि ३ रोजी जळगाव रेल्वे स्टेशन परिसरात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि साहित्यिक आदरणीय श्री.गिरीशजी प्रभुणे यांच्यासोबत ग्रेट भेट झाली. ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी अमळनेरला आले होते आणि परतीचा प्रवास रेल्वेने जळगावहून करणार होते. रेल्वेला विलंब झाल्यामुळे आमची भेट झाली.

आदरणीय गिरीशजींना २०२१ मध्ये सामाजिक कार्य श्रेणीमध्ये केंद्र सरकारने पद्मश्रीने सन्मानित केले आहे.

गिरिशजींच्या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाची आज प्रत्यक्ष ओळख झाली. त्यांच्या अनुभवी ज्ञानाचे दर्शन झाले. भेट योगायोगाने आणि आमच्या भाग्याने झाली. गिरीशजींनी पारधी समाजासाठी आणि इतर भटके विमुक्त समाजासाठी आयुष्यभर काम केले आहे आणि आताही वयाच्या ७२ व्या वर्षी काम करत आहेत संपूर्ण देशात जगभर त्यांचा प्रवास झाला आहे याच अनुभवाच्या शिदोरीतील काही भाग त्यांनी आम्हाला काल त्यांच्याशी केलेल्या संवादातून दिला.
यावेळी बऱ्याच सामाजिक विषयांवर चर्चा झाल्या. त्यांनी जळगाव जिल्ह्यातील रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या लहान बालकांच्या काळजी व सुरक्षा साठी अहोरात्री कार्य सुरू असलेल्या समतोल प्रकल्पाच्या कार्याची प्रंशसा केली. आज येवढ्या छोट्या स्टेशनवर ३७७८ बालके तुम्ही पालकांना मिळून दिले , खरे दैवत तुम्हीच आहात असे बोलत त्यांनी समतोल टीम ला अनमोल असे मार्गदर्शन करीत पुढे कार्य करण्यासाठी शुभेच्छा देत प्रोत्साहित केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!