Headlines
Home » राष्ट्रीय » आतिशी होणार दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री; विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी झाली निवड

आतिशी होणार दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री; विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी झाली निवड

DELHI NEW CM : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंतत्री पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आम आदमी पक्षाने सुरू केलेला नव्या चेहऱ्याचा शोध संपला आहे. दिल्ली आप सरकारमधील विद्यमान मंत्री आतिशी मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत.

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : केजरीवाल यांच्या तुरुंगवासानंतर सरकारमधील सर्वात शक्तिशाली मंत्री म्हणून उदयास आलेल्या आतिशी ह्या दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री होणार आहेत. अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी झालेल्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत आम आदमी पक्षाच्या प्रमुखांनी स्वतः त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. त्यावर आमदारांनी उभे राहून त्यांच्या मंजुरीची शिक्कामोर्तब केली. आतिशी ह्या कालकाजी येथून आमदार आहेत.

आतिशी ह्या केजरीवाल आणि सिसोदिया या दोघांचे विश्वासू मानल्या जातात. दिल्लीचे शैक्षणिक धोरण बनवण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जवळपास १८ विभाग हाताळणाऱ्या अतिशी यांना आता प्रशासनाचा चांगला अनुभव आहे. आतिशी यांना मुख्यमंत्री करून केजरीवाल यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी अर्धी लोकसंख्या आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे असे राजकीय वर्तुळामध्ये चर्चीले जात आहे.

दिल्लीतील २०२० च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने दिल्लीत ६२ जागा जिंकून सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन केले. केजरीवाल यांनी सलग तिसऱ्यांदा राजधानीत मुख्यमंत्रिपद भूषवले होते. पण २०२१-२२ साठी बनवलेल्या दारू धोरणाबाबत पक्ष अडचणीत सापडला. माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, राज्यसभा खासदार संजय सिंह आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना स्वतः तुरुंगात जावे लागले. त्यानंतर आतिशी ह्या मीडियासमोर आप पक्षाची भूमिका ठामपणे मांडत आल्या आहेत.

केजरीवाल यांच्या अटकेपासूनच भारतीय जनता पक्ष त्यांच्याविरोधात आक्रमक झाला होता. तुरुंगातूनच सरकार चालवणार यावर केजरीवाल ठाम राहिले. मात्र भाजपा त्यांच्या राजीनाम्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकत होता. सुप्रीम कोर्टातून जामीन मिळाल्यानंतर रविवारी केजरीवाल यांनी अचानक पदाचा राजीनामा जाहीर करून सर्वांनाच चकित केले.

आज दुपारी ४:३० वाजता केजरीवाल हे उपराज्यपाल दिल्ली यांच्याकडे आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असुन सोबतच नवीन सरकारच्या स्थापनेचा प्रस्ताव देखील दिला जाणार आहे. नव्या मुख्यमंत्र्याची घोषणा होण्यापूर्वी विधानसभा निवडणुकीपर्यंत हे पद देण्यात येत असल्याचे आम आदमी पक्षाने स्पष्ट केले आहे. पुढची लोकसभा निवडणूक जिंकल्यास केजरीवाल पुन्हा मुख्यमंत्री होतील.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!