Headlines
Home » जळगाव » जळगावच्या रस्त्यांची गंमतच लय न्यारी! भर पावसात आणि खड्डयांतील पाण्यात डांबर फवारुन केली डागडूजी !!

जळगावच्या रस्त्यांची गंमतच लय न्यारी! भर पावसात आणि खड्डयांतील पाण्यात डांबर फवारुन केली डागडूजी !!

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाचे आगमन होत असून सर्वत्र चैतन्याचे वातावरण दिसून येत आहे. मात्र बऱ्याच गणेश मंडळांना गणपती मूर्तीस आपल्या मंडपाठिकाणी आनण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. याचे कारण म्हणजे शहरातील मार्गावरील खड्डे. या खड्डयांमुळे आनंदावर जणुकाही विरजणच पडले आहे. गणपती आगमनाच्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत देखील रस्त्यावरील खड्डे न बुजल्याने गणेश भक्त तसेच गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधून नाराजीचा सुरु उमटला.

दरम्यान याच पार्श्वभूमिवर आज दि.६, शुक्रवार रोजी महानगर पालिकेच्या प्रशासकीय इमारतीपासून (१७ मजीली) हाकेच्या अंतरावर रस्त्याच्या डागडुजीस सुरवात झाली. आदेशाची तात्काळ अंमलबजावणी झाल्याने खुप बरे वाटले. मात्र त्यापेक्षाही आश्चर्यच जास्त वाटले. कारणही तसेच होते. जळगावकर आज चक्क स्वप्नवत वॉटर प्रूफ रस्ते बघत होते.

जळगाव शहरातील मोजके रस्ते सोडले तर इतर रस्ते हे खड्डयात गेले आहेत. रस्त्यावर खड्डे म्हणजे न सुटणारे एक कोडे बनले आहे. लाखो रुपये खर्च करून तयार केलेले किंवा डागडुजी केलेले रस्ते जेमतेम काही दिवसच तग धरत आहेत. गुणवत्ता ही कुठेच दिसत नसल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी रस्त्याचा उतार कोणत्या दिशेने व किती इंच असावा या गोष्टीकडे दुर्लक्ष केले गेले आहे. त्यामुळे अशा रस्त्यांचे बारा वाजले आहे. यांच्या कामच्या पद्धतीत शास्त्रशुद्धपणाच नाही तर कामच्या बाबतीत गुणवत्ता येणार तरी कशी ?

जळगावकरांचा टॅक्सरूपी कष्टाचा पैसा पाण्यात !

शहरातील भर वर्दळीच्या ठिकाणी आज सकाळी १० वाजेच्या सुमारास आदेशानुसार तात्काळ रस्त्याची डागडुजी करावयास सुरवात झाली होती. सकाळी पाऊस सुरु होता रस्ते ओले झालेले होते. पावसाचा वेग बऱ्यापैकी असल्याने रस्त्यावरील खड्डयांमध्ये पाणी साचले होते. वेळ सकाळची असल्याने चाकरमान्यांची वाहतूक देखील मोठ्या प्रमाणात सुरु झालेली होती.

अशा परिस्थित अक्षरशः ओल्या रस्त्यावर तसेच खड्डयांमधील पाण्यातच डांबराचे फवारे मारून त्यावर खडीचा बारीक कच फेकला जात होता. आणि त्यावर पुन्हा डांबर फवारले जात होते. काही खड्डे सोडले तर हा थर जेमतेम अर्धा इंच तर काही ठिकाणी त्यापेक्षाही कमी होता आणि त्यावर रोलर फिरवला जात होता. पावसाच्या पाण्यामुळे जमिनीवरील कच आणि डांबर हे रस्त्यावर न चिटकता ते रोलरच्याच चाकांना चिटकत होते.

एक मजूर फावड्याच्या साह्याने तो चिटकलेला कच आणि डांबर काढत होता. हा भयंकर प्रकार सुरु असतांना त्या मार्गावर सर्व प्रकारची रहदारी देखील सुरु होती. इतकेच नाही तर कच असलेले ट्रॅक्टर देखील त्यावर मागेपुढे चालवले जात होते. हा अजब गजब प्रकार बघून जळगाव कर मात्र हसण्यापलिकडे काहीच करत नव्हते.

रस्त्याच्या डागडुजीचा हा प्रकार बघून आपल्या कष्टाचा हा टॅक्स रूपी पैसा असून तो अक्षरशः पाण्यात वाया जातं आहे, असे एकाही जळगावकराच्या मनात त्यावेळी आले नसावे का ? एकाही जळगावकराने सदर कामावरील ठेकेदार किंवा सुपरवायझर ला याबाबत प्रश्न का केला नाही ?

सुज्ञ नागरिक देखील या प्रकारावर बोलायला जर तयार नसतील तर सकाळी झालेल्या या डागडुजीची पद्धत योग्य की अयोग्य हे वेगळे सांगायला नको.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!