Home » जळगाव » कान्ह ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासुन साकारले १०८ गणपती

कान्ह ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासुन साकारले १०८ गणपती

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के.सी.ई. सोसायटीच्या कान्ह ललित कला केंद्र व ओजस्विनी कला महाविद्यालय जळगाव, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चला मातीचे गणपती बनवूया या तीन दिवसीय शालेय विद्यार्थ्यांच्या कार्यशाळेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. कार्यशाळेतील सहभागी विद्यार्थ्यांनी मातीच्या १०८ गणपतीच्या मूर्त्या कल्पक रित्या साकारल्या.

तीन दिवसीय कार्यशाळेच्या माध्यमातून शाडू माती पासून गणपती तयार करताना, गणपती स्थापनेच्या शास्त्रीय पद्धतींच्या आधारावर गणेश मूर्ती बनवण्याचे प्रात्यक्षिक शिल्पकार दिगंबर शिरसाळे व देवा सपकाळे, पियुष बडगुजर यांनी विद्यार्थ्यांना दिले. गणपतीची बैठक व्यवस्था, शरीर यष्टी, सोंडेचा आकार, मुगुट आणि आयुध इत्यादी बाबतीत विद्यार्थ्यांना शास्त्रीय पद्धतीने मार्गदर्शन करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गणपतीची प्रतिष्ठापना विद्यार्थी स्वतःच्या घरी करणार असून, पर्यावरण पूरक गणेशोत्सव साकारण्याचा संकल्प विद्यार्थी पूर्ण करणार आहेत. कान्ह ललित कला केंद्राचे संचालक शशिकांत वडोदकर, व ओजस्विनी कला महाविद्यालयाचे प्राचार्य मिलन भामरे, ओरियन सीबीएसी स्कुलच्या प्राचार्य सुषमा कंची, ओरियन स्टेट बोर्ड स्कूलचे प्राचार्य श्रीधर सुरंगी यांच्या शुभ हस्ते उपस्थित विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आले.

कार्यशाळेच्या आयोजनासाठी पुरुषोत्तम घाटोळ, राजेंद्र सरोदे यांचे सहकार्य लाभले .

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!