Headlines
Home » जळगाव » मानव सेवा माध्यमिक विद्यालयात पर्यावरणपूरक गणपती बनवणे कार्यशाळा संपन्न

मानव सेवा माध्यमिक विद्यालयात पर्यावरणपूरक गणपती बनवणे कार्यशाळा संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मानव सेवा माध्यमिक विद्यालयात पर्यावरणपूरक शाडू मातीपासून गणपती बनवणे कार्यशाळा घेण्यात आली. यात इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कलाशिक्षक सुनील दाभाडे व रत्ना चोपडे यांनी मूर्ती बनवण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा सूर्यवंशी यांनी पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची स्थापना व विसर्जन याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक शाडू माती पासून आकर्षक गणेश मूर्ती बनवून, सजावटीचे साहित्याचा वापर करून मूर्त्या सजविल्या.

विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेल्या मूर्तीची घरी स्थापना करण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी अलका महाजन, अनिता शिरसाठ, गिरीष जाधव उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!