Home » महाराष्ट्र » रेशनप्रमाणे लाडक्या बहिणींचे पैसे कायमस्वरूपी जमा होत राहणार : विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे

रेशनप्रमाणे लाडक्या बहिणींचे पैसे कायमस्वरूपी जमा होत राहणार : विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे

महिलांच्या सन्मान आणि समृद्धीसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना

नंदुरबार ( वास्तव पोस्ट ) : महिलांना समाजासह, कुटुंबात सन्मान मिळावा, त्यांचे अर्थकारण समृद्ध सक्षम व्हावे यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना शासनाने सुरू केली आहे. जसे वर्षानुवर्षे रेशनचे धान्य आपल्याला मिळत आहे, त्याचप्रमाणे लाडकी बहिण योजनेचे पैसे बहिणींच्या खात्यावर जमा होत राहतील, अशी ग्वाही विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केले आहे.

त्या जिल्ह्यातील सोयरापाडा ता. अक्कलकुवा येथे आयोजित मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या मेळाव्यात बोलत होत्या यावेळी विधान परिषदेचे सदस्य आमदार आमशा पाडवी, राज्य महिला आयोगाच्या सदस्या संगिता चव्हाण, जि.प.चे समाज कल्याण सभापती तथा सदस्य शंकर पाडवी,पंचक्रोशीतील सरपंच, पंचायत समितीचे सदस्य, जिल्हा परिषद सदस्य लोकप्रतिनिधी तसेच महिला मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना गोऱ्हे म्हणाल्या, माझ्या कामाची सुरवात आदिवासी भागातील महिलांच्या प्रश्नातून झाली आहे. महिलांमध्ये लक्ष्मी,दुर्गा, सरस्वती असते. महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगून त्या म्हणाल्या, दहेली जलसिंचन प्रकल्पाचा प्रश्न गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबीत होता. धरण झाले त्याच्यावर ४२२ कोटींचा खर्च करूनही त्याला कालवे नव्हेत, या कालव्यांना मान्यता देण्याचे काम या शासनाने केले आहे. या धरणामुळे २६ गावातली ३ हजार २०० हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे.

त्या म्हणाल्या, जसे रेशन वर्षानुवर्षे मिळत आहे. तसे लाकडी बहिण योजनेचे पैसे देखील मिळत राहतील. त्यासाठी निवडणूकीत चांगली कामे करणारी माणसं निवडून देण्याची दबाबदारी नागरीकांची असते. पुढच्या सहा महिन्यात नंदुरबार जिल्ह्यातले रस्ते चकाकण्यासाठी मदत करणार असल्याचे सांगून त्या पुढे म्हणाल्या, बॅंकांमधली गर्दी पाहता बॅंकांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र रांगा करण्यासाठी सूचना केल्या जातील.

यावेळी कार्यक्रमात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांना महिला, भगिनींना धनादेशाचे वितरण करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!