Home » महाराष्ट्र » महाराष्ट्रात ८०हजार कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता ; राज्याच्या विकासाला नवीन दिशा मिळणार : मुख्यमंत्री शिंदे

महाराष्ट्रात ८०हजार कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता ; राज्याच्या विकासाला नवीन दिशा मिळणार : मुख्यमंत्री शिंदे

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मुंबई महानगर आणि परिसर जागतिक आर्थिक केंद्र बनविण्यासाठी NITI आयोग ने केलेल्या अभ्यासाचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज सुपुर्द करण्यात आला. निती आयोगाने मुंबईच्या जीडीपीला पुढील पाच वर्षांत दुप्पट करण्याचे ध्येय ठेवले आहे, ज्यासाठी सात महत्वाच्या क्षेत्रांवर विशेष भर दिला जात आहे. या उपक्रमांमुळे राज्याच्या विकासाला नवीन दिशा मिळेल आणि दळणवळण तसेच संपर्कांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुंबई आणि महानगर परिसरातील संधींचा लाभ घेऊन एकात्मिक विकासाची दिशा नियोजन NITI आयोग ने आखली आहे. परवडणाऱ्या घरांची उभारणी, रोजगार निर्मिती, डेटा सेंटर्सना प्राधान्य आणि अलिबाग मल्टीमोडल कॉरिडोरच्या विकासाला गती देण्याच्या योजना आहेत. तसेच, महाराष्ट्रात ८० हजार कोटींच्या गुंतवणुक प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या ७२० किमी लांबीच्या समुद्र किनाऱ्याचा पर्यटन विकासासाठी उपयोग करण्याच्या दिशेने देखील प्रगती होत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

‘वर्षा’ निवासस्थानी आयोजित या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही. आर. सुब्रमण्यम, मुख्य सचिव सुजाता सौनिक आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!