Headlines
Home » जळगाव » लाडक्या बहिणींना सक्षम करणे हेच आमचे उद्दीष्ट : आमदार मंगेश चव्हाण

लाडक्या बहिणींना सक्षम करणे हेच आमचे उद्दीष्ट : आमदार मंगेश चव्हाण

चाळीसगाव ( वास्तव पोस्ट ) : येथील आमदार मंगेश चव्हाण यांच्या आमदार निधीतून साकारण्यात आलेल्या महिला बचत गटांसाठी असणाऱ्या चाळीसगाव तालुक्यातील पहिल्या प्रभाग संघाच्या इमारतीचे लोकार्पण आज मेहुणबारे

येथे करण्यात आले. यावेळी जमलेल्या लाडक्या बहिणींशी आमदार चव्हाण यांनी संवाद साधत त्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.

महिला बचत गटांच्या महिलांना हक्काचे व्यासपीठ असावे अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती. अनेकांनी याची आश्वासने देऊन मते घेतली, पदे भोगली मात्र ते साधी वीटही रचू शकले नाहीत. एकप्रकारे नारीशक्तीचा विश्वासघातच त्यांनी केला असेही आमदार मंगेश चव्हाण म्हणाले.

यावेळी आमदार चव्हाण यांनी भावनिक बोलून, खोटी आश्वासने देऊन काम करून घेणे माझा स्वभाव नाही. आज चाळीसगाव तालुक्यात मेहुणबारे येथील प्रभागसंघ कार्यालय पूर्ण झाले असून देवळी येथील प्रभागसंघ कार्यालय बांधकाम अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पातोंडा, पिलखोड, वाघडू, खडकी बु येथे कार्यालय मंजूर झाले आहेत. माझ्या लाडक्या बहिणींना सक्षम करणे हेच माझे उद्दीष्ट आहे.

स्त्रीला संधी मिळाली की कुटुंबाचे जीवन बदलते, स्त्री सक्षम झाली की संपूर्ण समाजाचे भविष्य उज्ज्वल होते, माझ्या चाळीसगाव तालुक्यातील लाडकी बहीण आता जग जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे, असा विश्वास देखील आमदार चव्हाण यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!