जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांचे संकल्पनेतून व आयुष प्रसाद जिल्हाधिकारी जळगाव, यु.आर.वर्मा विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क, नाशिक विभाग नाशिक, व्ही.टी. भुकन अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क जळगाव यांचे हस्ते सन २०२४-२५ या कालावधीमध्ये बनावट मदय निर्मीती, हातभटटी दारु निर्मीती, विक्रीचे गुन्हे उघडकीस आणून राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागातील पहिला एमपीडीए प्रस्ताव यशस्वी केल्याबद्दल अधिकारी कर्मचारी यांना आज १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचीत्य साधून प्रशस्तीपत्र व पदक देऊन गौरव करण्यात आला.
प्रशस्तीपत्र व पदक प्रदान करण्यात आलेल्यांमध्ये निरीक्षक डी.एम.चकोर, सी.एच. पाटील दुययम निरीक्षक, एस.बी.भगत, सी.आर. शिंदे, एस.बी. चव्हाण, वाय.वाय. सुर्यवंशी, जी.सी.कंखरे, व्ही.एन.बाविस्कर सहाय्यक दुय्यम निरीक्षक, सुरेश मधुकर मोरे, जवान गिरीश सुर्यभान पाटील, गोकुळ डीगंबर अहिरे, दिनेश नाना पाटील, सत्यम राजेंद्र माळी, धनसिंग सुंभा पावरा, प्रकाश पंडीतराव तायडे, रविंद्र दिनकर जंजाळे, विपूल बलदेव राजपूत, आर.टी. सोनवणे, व्ही.डी.हटकर, एम.एम.मोहीते, पी.एस. भांबरे, नंदकिशोर पवार यांचा समावेश होता.
