जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ओरियन सी.बी.एस.ई. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पालक-शिक्षक संघाच्या सभेत नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. या सभेत पालकांनी केलेल्या सूचनांचे स्वागत करुन त्यातील योग्य त्या सूचना अंमलात आणण्याचे आश्वासन संघाच्या पदसिद्ध अध्यक्षा व प्राचार्या सुषमा कंची यांनी दिले.
पालक-शिक्षक सभा म्हणजे शाळेची कार्यप्रणाली आणि पालक यांच्यातील दुवा समजला जातो. यात संघाचे उपाध्यक्ष, सेक्रेटरी, ज्वाइंट सेक्रेटरी यांची निवड करण्यात आली. शिक्षकांच्या वतीने जॉइंट सेक्रेटरी भारती खडके यांनी मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन केले. प्राचार्या सुषमा कंची यांनी होलेस्टिक प्रोग्रेस रिपोर्ट कार्ड आणि स्किल एज्युकेशनबद्दल माहिती दिली. तसेच वेगवेगळ्या कमिटीचे संघटन कसे करावे? याविषयी मार्गदर्शन केले. त्यामध्ये पोस्को कमिटी, विशाखा कमिटी आणि डिसिप्लिन कमिटीची स्थापना करण्यात आली.
प्रमुख मान्यवर खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक राणे आणि संस्थेच्या मानव संसाधन विभागाचे प्रमुख गोकूळ पाटील उपस्थित होते.
