Headlines
Home » शैक्षणिक » लोकमान्य विद्यालयात शिक्षण सप्ताह उत्साहात संपन्न ; विविध उपक्रम साजरा

लोकमान्य विद्यालयात शिक्षण सप्ताह उत्साहात संपन्न ; विविध उपक्रम साजरा

अमळनेर ( वास्तव पोस्ट न्यूज ) : येथील लोकमान्य विद्यालयात महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आयोजित शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशान्वये २२ जुलै ते २८ जुलै २०२४ या कालावधीत शिक्षण सप्ताह चे आयोजन करण्यात आले. सदर त्यात अनेक उपक्रम घेण्यात आले. यामध्ये विज्ञान दिवस, वाचन दिवस, मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस, क्रीडा दिवस, सांस्कृतिक दिवस, कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस, इको क्लब फाॅर मिशन लाईफ उपक्रम, गीत गायन, पेंटींग, विविध खेळ, वेशभूषा अशा विविध उपक्रमांचा समावेश केला गेला. शिक्षण सप्ताहामुळे विद्यार्थी, शिक्षक, यांच्यामध्ये सहकार्य वाढीस लागणार आहे.

या सप्ताहातील कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयातील जेष्ठ शिक्षक जितेंद्र चौधरी, मनिषा खांजोडकर, सायली देशपांडे, मधुकर सोनार, आशा सोनवणे, रेखा कांबळे, मृदूला झारे, माधुरी सोनार, संदीप महाजन यांनी केले. तसेच संपूर्ण सप्ताहाचे तांत्रिक सहाय्य तंत्रस्नेही शिक्षक भूषण महाले यांनी केले. साप्ताहिक उपक्रम यशस्वीतेसाठी सर्वांना विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोहर महाजन यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!