Home » राष्ट्रीय » ब्रेकिंग : पूजा खेडकर विरोधात FIR दाखल ; अधिकारी वर्गात मोठी खळबळ !

ब्रेकिंग : पूजा खेडकर विरोधात FIR दाखल ; अधिकारी वर्गात मोठी खळबळ !

FIR Against IAS Puja Khedkar: जून २०२४ मध्ये त्यांच्या प्रोबेशनरी प्रशिक्षणाचा भाग म्हणून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू झालेल्या ३२ वर्षीय खेडकर यांच्यावर UPSE नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी ओबीसी आणि बेंचमार्क अपंग व्यक्ती कोट्याचा गैरवापर केल्याचा आरोप आहे.

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट न्यूज ) : वादग्रस्त आईएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांच्याविरोधात केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) मोठी कारवाई केली आहे. यूपीएससीच्या तक्रारीवरुन दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने पूजा खेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

पूजा खेडकर वर बनावट कागदपत्रे दाखल करणे, अपंगत्व आणि IT कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूजाने बनावट कागदपत्रे सादर करून UPSC परीक्षा निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळा दिली. बनावट ओळखीच्या आधारे UPSC मध्ये निवड झाल्याचा आरोप पूजा खेडकर यांच्याविरुद्ध आहे.

दरम्यान या प्रकरणी पूजा खेडकरची उमेदवारी का रद्द करू नये ? अशी कारणे दाखवा नोटीस देखील यूपीएससीने बजावली आहे. तसेच पूजा खेडकर यांना यापुढे कोणतेही परीक्षा देण्यास बंदी घालण्यात आली असून यूपीएससीने पूजा खेडकर प्रकरणात सखोल तपास केला. तपासाअंती यूपीएससीने हे निष्कर्ष काढले आहेत. यामध्ये पूजा खेडकरने जास्त वेळा परीक्षा दिल्या आहेत. यूपीएससी परीक्षेचे नियम डावलून खोटे कागदपत्रे सादर करून त्यांनी परीक्षा दिल्या आहेत.

पूजा खेडकर यांनी आपले ओळखपत्र बदलून आणि आई-वडीलांचे आणि स्वतःचे नाव बदलून परीक्षा दिल्या. ई मेल आयडी, पत्ता, मोबाईल नंबर आणि सही सुद्धा बदलली असल्याचे यूपीएससीला तपासात आढळून आले आहे.

केंद्राला राज्य सरकारकडून अहवाल सादर :
राज्य सरकारने देखील केंद्राकडे अहवाल सादर केलेल्या अहवालात काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. आठवड्याच्या चौकशीनंतर अतिरिक्त मुख्य सचिव नितीन गराडे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने पूजा खेडकर यांच्याबाबत अहवाल तयार केला. केंद्र सरकारने स्थापन केलेल्या एक सदस्यीय समितीलाही या अहवालाची प्रत पाठवण्यात आली आहे. खेडकर यांनी सेवांमध्ये रुजू होण्यापूर्वी केलेल्या विविध दाव्यांची सत्यता तपासणी केली असता यामध्ये त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्रे याचा समावेश आहे. या आधारेच त्यांनी ओबीसी आणि पीडब्ल्यूबीडी कोट्याचे फायदे मिळवले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!