Home » महाराष्ट्र » चंद्रभागा बसस्थानक आणि प्रवासी व चालकांच्या निवास इमारतीचे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते लोकार्पण

चंद्रभागा बसस्थानक आणि प्रवासी व चालकांच्या निवास इमारतीचे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते लोकार्पण

पुणे ( वास्तव पोस्ट न्यूज ) : एसटी महामंडळाच्या महत्वाकांक्षी अतिभव्य अशा चंद्रभागा यात्रा बसस्थानक आणि प्रवासी तसेच यात्रेकरू निवासस्थानाचे लोकार्पण करण्यात आले आहे. एसटीचा हा अशा प्रकाराचा पहिलाच प्रकल्प असून येथून राज्यातील सर्व मार्गावर बसेस सोडण्यात येणार असल्याने प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. या पंढरपूरातील आषाडी एकादशीचा मुहूर्त साधून या चंद्रभागा बसस्थानक आणि प्रवासी निवास इमारतीचे आज भाजपाचे नेते गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.

या यात्रेकरुन निवासात भाविकांची अल्पदरात निवासाची सोय होणार आहे. तसेच ५०० एसटी कर्मचाऱ्यांच्या निवासाची देखील व्यवस्था होणार आहे. आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या यात्रेसाठी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी एसटी महामंडळाकडून आपल्या ११ हेक्टर जागेवर ३४ फलाटाचे अति भव्य चंद्रभागा यात्रा बस स्थानक निर्माण करण्यात आले आहे. तसेच पंढरपूरला दररोज येणाऱ्या भाविक- यात्रेकरूंच्या निवासाची अल्प दरात सोय व्हावी या दृष्टीने बस स्थानकाला लागूनच यात्री निवास बांधण्यात आले आहे. या यात्री निवासामध्ये ५०० एसटी कर्मचारी तसेच एकाच वेळी सुमारे १हजार यात्रेकरुंची निवासाची सोय होणार आहे. एसटी कर्मचारी व यात्रेकरूंसाठी २ सुसज्ज उपहारगृहे देखील बांधण्यात आली आहेत. राज्यात एसटी महामंडळाचा हा पहिलाच प्रकल्प असून त्यासाठी एकूण ३३ कोटी रुपये खर्च आले आहेत.

दरम्यान या बसस्थानकात वाहतूक नियंत्रण कक्ष, आरक्षण कक्ष, पुरुष आणि महिला तसेच दिव्यांगाकरीता स्वतंत्र विश्रांतीगृह आणि प्रसाधनगृह, हिरकणी कक्ष, आपला दवाखाना, जेनेरिक औषधालय, पार्सल कक्ष, पोलीस मदत केंद्र, वातानुकूलित प्रतीक्षालय, प्रशस्त वाहनतळ, दोन उद्वावाहक आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. सबंध महाराष्ट्राचे दैवत असलेल्या विठू माऊलीच्या दर्शनासाठी येणाऱ्या असंख्य यात्रेकरूंसाठी या दोन्ही सेवा अतिशय उपयुक्त ठरणार आहेत. या दूरदर्शी प्रकल्पाबद्दल महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे मंत्री महाजन यांचेकडून विशेष अभिनंदन करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!