Mamata Banerjee visits Matoshree : आजच्या या भेटीबाबत उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, ही आमची कौटुंबिक भेट असून या भेटीचा राजकारणाशी काही संबंध नाही. ममता बॅनर्जी यांनी मात्र आपण या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचा प्रचार करणार, असं माध्यमांना सांगितले.
मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. मुंबईत येताच ममता बॅनर्जी यांनी आज शिवसेना पक्ष ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ वर जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली.
उद्योगपती मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी यांच्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आज मुंबईत आल्या आहेत. ममता बॅनर्जी या उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी त्यांची भेट घेण्यासाठी गेल्या. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बातचित झाली. ममता बॅनर्जी यांचा पक्ष हा इंडिया आघाडीतला महत्त्वाचा पक्ष आहे. उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांची राजकीय मैत्री आहे. दरम्यान, आजच्या भेटीनंतर माध्यमांसोबत बोलतांना उद्धव ठाकरे यांनी म्हटले की ही आमची कौटुंबिक भेट असून या भेटीचा राजकारणाशी काही संबंध नाही. तर ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. मोदी सरकार हे स्थिर नाही, असं ममता बॅनर्जी स्पष्ट म्हणाल्या आहेत.
यावेळी केंद्र सरकारने घेतलेल्या ‘संविधान हत्या दिवस’ या निर्णयावर ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली. “सर्वात जास्त आणीबाणी तर मोदींच्या काळातच होतेय. आम्ही आणीबाणीला पाठिंबा देत नाहीत. पण कोणीतीही चर्चा न करता मोदी सरकारने निर्णय घेतला”, अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली.
ममता बॅनर्जी काय म्हणाल्या की, “मी उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यासोबत आहे. मी मुंबईत येते तेव्हा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना भेटते. शरद पवार हे तर ज्येष्ठ नेते आहेत”, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. महाराष्ट्रात आगामी काळात विधानसभेच्या निवडणुकी आहेत. या विधानसभा निवडणुकीत आपण उद्धव ठाकरे यांचा प्रचार करणार, असं ममता बॅनर्जी यांनी माध्यमांना सांगितलं. केंद्र सरकार कसे स्थिर आहे ते तुम्हीच आम्हाला सांगा, असे वक्तव्य देखील ममता बॅनर्जी यांनी केले.
यावेळी उद्धव ठाकरे काय म्हणाले “ही आमची कौटुंबिक मुलाखत होती. यामध्ये राजकारण आणू नका. आम्हाला जे म्हणायचं असतं ते आम्ही उघडपणे बोलतो. आम्ही कुणाला घाबरत नाही. आम्हाला जिथे जे बोलयचं आहे तिथे आम्ही बोलतो आणि बोलत राहू.
